नांदेड - जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तामसा गावाच्या निवडणूकीत रंगत आली आहे. नगरपंचायत दर्जाइतकी मोठी ग्रामपंचायत असलेल्या तामसा गावावर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे सेनेचे बंडखोर नेते बाबुराव कदम यांच्या विरोधात आजी-माजी आमदार रिंगणात उतरले आहेत. तामसा येथील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ
निजामकाळापासून नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून तामसा गावाची ओळख आहे. मात्र हदगाव तालुक्यातील तामसा या गावाचा अद्याप काहीही विकास झालेला नाही. या गावाच्या विकासासाठी तामसा गावाला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी आहे.
तामसा ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचेही दुर्लक्षमात्र तामसेकरांच्या या मागणीकडे शिवसेना आणि काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी दुर्लक्षच केले. त्यामुळे मोठे गाव असलेल्या तामसा गावचा बकालपणा कायम आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधीचा खर्च झालाय मात्र गावात पाणीच पोहोचलेले नाही. अशा विविध मुद्द्यांवर शिवसेनेचे बंडखोर नेते बाबुराव कदम हे निवडणुकीत उतरले आहेत. कदम यांनी सर्व जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीत बाबुराव कदम यांनी केली होती बंडखोरीविधानसभा निवडणुकीत बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली होती. थोड्याशा मतांनी कदम यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे माधवराव पाटील निवडून आले. मात्र या धक्क्यातून सावरत बाबूराव कदम यांनी समर्थकांना घेऊन पुन्हा राजकारण सुरू केले आहे. कदम यांना मोठे समर्थन मिळत असल्याने त्यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे माजी आमदार एकत्र आले आहेत. त्यामुळे तामसा ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
तामसा निवडणुकीत जोरदार माहोलसभा, प्रचारासाठी रोखपणे मजुरी आणि दारू मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यातून तामसा गावात निवडणुकीचा जोरदार माहौल तयार झाला आहे. त्यामुळे तामसा येथील सुज्ञ मतदार कुणाला साथ देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागल आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.