ETV Bharat / state

नांदेड : रुग्णांसह नातेवाईकांच्या मदतीला सरसावले तरुण; दररोज दोनशे डब्यांचे वाटप - youth helping hand to corona patients

कामठा येथील शुभम स्वामी या तरुणानेने पुढे येत, स्वामी ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना डबे वाटपाचे काम सुरू केले आहे. सकाळी शंभर आणि सायंकाळी शंभर असे दोनशे डब्बे वाटप केले जात आहे.

दररोज दोनशे डब्यांचे वाटप
दररोज दोनशे डब्यांचे वाटप
author img

By

Published : Apr 28, 2021, 3:29 PM IST

Updated : Apr 28, 2021, 4:39 PM IST

नांदेड - कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी ग्रामीण भागातील तरुण सरसावले आहेत. शहरापासून जवळच असलेल्या अंतरावर असलेल्या कामठा येथील स्वामी ग्रुपतर्फे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन पुरवले जात आहे.

कोरोना आजाराच्या उपचारासाठी अनेक जन खेड्यापाड्यातून रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांच्या जेवणाची मोठी हेळसांड होत होती. मात्र, यासाठी काही सेवभावी संस्था आणि नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कामठा येथील शुभम स्वामी या तरुणानेने पुढे येत, स्वामी ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना डबे वाटपाचे काम सुरू केले आहे. सकाळी शंभर आणि सायंकाळी शंभर असे दोनशे डबे वाटप केले जात आहे. गनपुर कामठा येथे स्वयंपाक तयार केला जातो. या कामासाठी स्वामी ग्रुपमधील सदस्य पुढे आले आहेत. यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना लाभ होत आहे.

रुग्णांसह नातेवाईकांच्या मदतीला सरसावले तरुण

हेही वाचा-बीकेसी कोविड सेंटरमध्ये आज लसीकरण बंद; पुन्हा लसीचा तुटवडा

दूरध्वनीवर केली जाते नोंदणी-

कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण पुरवण्यासाठी स्वामी ग्रुपने उपक्रम सुरू केला आहे. शेकडो रुग्ण कोरोना उपचारासाठी नांदेड येथे रुग्णालयात दाखल होत आहेत. अशा रुग्णांना आणि नातेवाईकांना जेवणासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी स्वामी ग्रुपने डबे सुरू केले आहेत. ज्या रुग्णांना डबे हवे आहेत त्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधायचा आहे. ज्या रुग्णालयातून नातेवाईकानी नाव नोंदणी केली आहे, तिथे जाऊन ग्रुपचे सदस्य डबे वाटप करतात. यामुळे रुग्णांनादेखील वेळेवर डबे मिळण्यास मदत होत असल्याचे स्वामी ग्रुपचे प्रमख शुभम स्वामी यांनी सांगितले. स्वामी ग्रुपच्या माध्यमातून सुरू केलवल्या या उपक्रमाचे नांदेडकरांनी कौतुक केले आहे.

स्वामी ग्रुप
स्वामी ग्रुप

स्वयंस्फूर्तीने तरुण आले पुढे-

कोरोना रुग्णांच्या मदतीला कामठा येथील तरुण मदतीला आले आहेत. घरातील सर्व कामे सोडून तरुण दिवसरात्र रुग्णसेवसाठी वेळ देत आहेत. शुभम स्वामी आणि त्याचे मित्र मागील दहा ते बारा दिवसांपासून डबे पुरवण्याचे काम करत आहेत. सकाळी भाजीपाला घेण्यापासून ते स्वच्छ धुणे, कापणे आणि स्वयंपाक पूर्ण करून ते रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे तरुण करत आहेत. त्यामुळे रुग्णांनादेखील स्वामी ग्रुपच्या डब्याचा आधार मिळत आहे.

स्वयंपाकाचे काम सुरू
स्वयंपाकाचे काम सुरू

हेही वाचा-ऑक्सिजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण

जेवणाबाबत नातेवाईकांमधून समाधान-

कोरोना रुग्णांना दिले जाणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आमदार बालाजी कल्याणकर यांनी नुकतेच केला होता. ते सध्या गुरुगोविंद सिंगजी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी त्यांना रुग्णालय प्रशासनाचा कटू अनुभव आला. मात्र, स्वामी ग्रुप कडून मिळणाऱ्या भोजनावर रुग्ण आणि नातेवाईक समाधानी आहेत.

Last Updated : Apr 28, 2021, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.