नांदेड - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख २६ हजार २८३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८८८ कोटी ८३ लाख रुपये एवढ्या रक्कमेचे हस्तांतरण झाले आहे. अद्याप १६ हजारांवर शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाचे काम शिल्लक आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ४ ९ १ कर्जखात्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना १ हजार ४६१ कोटी ३६ लाख रुपये एवढ्या रकमेची कर्जमाफी मिळू शकेल. एकूण २ लाख १२ हजार ७५९ कर्जखाती (९९.१९ टक्के) आधार संलग्न करण्यात आली आहेत. त्यापैकी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर १ लाख ९७ हजार ९१७ खाती (९३.०२ टक्के) अपलोड करण्यात आली.
पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या कर्जखात्यांची संख्या १ लाख ७४ हजार एवढी आहे. त्यापैकी १ लाख ५७ हजार ९७२ शेतकऱ्यांनी (९०.७९) आधार प्रमाणिकरण करुन घेतले आहे. १ लाख २६ हजार २८३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ८८८ कोटी ८३ लाख रूपये हस्तांतरित केले आहेत.
कर्जमुक्ती योजना स्थिती (कोटी रुपये मध्ये )
एकूण कर्जखाती-१२१४४ ९१
एकूण रक्कम-१४६१.३६
आधार संलग्न खाती -२१२७५९
पोर्टलवर अपलोड खाती-१९ ७९१७
पोर्टलवर प्रसिध्द लाभार्थी यादी-१७४०००
आधार प्रमाणिकरण खाती -१५७९७२
रक्कम हस्तांतरित खाती-१२६२८३
हस्तांतरित रक्कम-८८८.८३