ETV Bharat / state

तपासणीच्या नावाखाली मारहाण करत लूट; नांदेडमधील सहा महामार्ग पोलीस निलंबित

नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलीस चौकीच्या सहा पोलिसांना तपासणीच्या नावाखाली लुटमार केल्याच्या तक्रारीवरुन रविवारी निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित
author img

By

Published : Aug 12, 2019, 5:32 PM IST

Updated : Aug 12, 2019, 5:53 PM IST

नांदेड - येथील नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलिसांनी तपासणीच्या नावाखाली लुटमार केल्याची दाखल झाली होती. या प्रकरणी चौकीच्या ६ पोलिसांना रविवारी निलंबित करण्यात आले आहे.

नांदेडच्या ६ महामार्ग पोलिसांवर निलंबनाची गदा

नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीबाबत मागील अनेक दिवसांपासून वरिष्ठ कार्यालयात तक्रारी दाखल केल्या जात होत्या. अनेकवेळा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करून तपासणीच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार घडत होते. या गंभीर प्रकाराकडे पोलीस वरिष्ठ कार्यालय दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे या भागातील सुभाशिष कामेवार यांनी येथील पोलिसांचे चुकीचे व लुटारु पद्धतीने केलेल्या कामाचे सर्व पुरावे महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयात दाखल करत तक्रार केली होती. एवढेच नव्हे, तर हा प्रकार थांबला नाही तर स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता.

यावरून पोलीस अधीक्षक संजय शेत्रे यांनी विजय सुर्यवंशी, दिपक जाधव, आबाजी खोमणे, गणेश लोसरवार, गोविंद मुंडे आणि ईश्वर राठोड यांना निलंबीत केले आहे. सध्या, या निलंबनाच्या कारवाईमुळे येथील अनेक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

Intro:नांदेड येथील सहा महामार्ग पोलीस निलंबित.....!

नांदेड : नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलिस चौकीच्या सहा पोलिसांना रविवारी निलंबित करण्यात आले आहे.Body:नांदेड येथील सहा महामार्ग पोलीस निलंबित.....!

नांदेड : नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलिस चौकीच्या सहा पोलिसांना रविवारी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या महामार्ग पोलिस चौकीबाबत मागील अनेक दिवसांपासून तक्रारी वरिष्ठ कार्यालयात केल्या जात होत्या. अनेकवेळा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करून त्याला तपासणीच्या नावाखाली लुटण्याचा प्रकार घडत आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. या भागातील सुभाशीष कामेवार यांनी येथील पोलिसांच्या सर्व चुकीच्या व लुटारु पद्धतीचे सर्व पुरावे महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयात दाखल करून तक्रार केली होती. एवढेच नाही तर हा प्रकार नाही थांबला तर स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
यावरून पोलिस अधिक्षक संजय शेत्रे यांनी विजय सुर्यवंशी, दिपक जाधव, आबाजी खोमणे, गणेश लोसरवार, गोविंद मुंडे आणि ईश्वर राठोड यांना निलंबीत केले. या निलंबनाच्या कारवाईमुळे येथील अनेक पोलिसांचे धाबे दणाणले आहेConclusion:
Last Updated : Aug 12, 2019, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.