नांदेड - भोकर येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध भोकर पोलिसात पोस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी बाबुराव चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे.
बालाजी बाबुराव चव्हाण याने एका अल्पवयीन मुलीस थेरबन शिवारात घेवून जावून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३७६(२) (i) भादविसह ४,८१२ पोस्को अँक्ट २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक गजभारे करीत आहेत.