ETV Bharat / state

गावच्या बहिष्काराने 'मरणयातना'.. वाहनात कोणी घेईना, 6 किलोमीटर चालत गेल्यानं महिलेचा गर्भपात

गावकर्‍यांच्या सांगण्यावरुन तसेच गावकर्‍यांच्या दहशतीखाली असलेल्या वाहनधारकांनी महिलेला रुग्णालयापर्यंत सोडण्यास मनाई केली. वाहनधारकांनी नकार दिल्याने शेवटी तिला जवळपास सहा किलोमीटर पायी चालावे लागले. त्यामुळे महिलेचा गर्भपात झाला.

नांदेड
author img

By

Published : Jun 26, 2019, 12:10 AM IST

Updated : Jun 26, 2019, 11:30 PM IST

नांदेड - गावाने बहिष्कार टाकल्यामुळे एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज एकविसाव्या शतकातही बहिष्काराची जीवघेणी परंपरा सुरू आहे. जिल्ह्यातील महिपाल पिंपरी या गावात लोकांनी पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबातील महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेणे गरजेचे होते. यासाठी महिलेच्या कुटुंबातील लोकांनी प्रवासी वाहतूक करणारे वाहन भाड्याने मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोणता वाहन चालक आला नाही. गावकर्‍यांच्या सांगण्यावरून वाहनधारकांनी त्यांचे भाडे घेणे टाळले.

गावानं बहिष्कार टाकल्याने महिलेचा गर्भपात

पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्यातील गर्भवती महिलेच्या पोटात त्रास होत असतानाही तिला शहरात घेऊन गेले नाहीत. वाहनधारकांनी नकार दिल्याने शेवटी तिला जवळपास सहा किलोमीटर पायी चालावे लागले. त्यामुळे महिलेचा गर्भपात झाला. प्रचंड मरण यातना सहन करत हे जग पाहण्याअगोदरच पोटचा गोळा तिला गमवावा लागला. याप्रकरणी जबाबदार असणार्‍या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मंगलाबाई पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी महिपाल येथील महिला मंगलाबाई पवार यांच्या पोटात अचानक दुखत असल्याने त्यांनी पिंपरी महिपाल ते नांदेड व वसमत मार्गावर चालणार्‍या प्रवाशी वाहनधारकांना रुग्णालयापर्यंत सोडण्याची मागणी केली. परंतु, गावकर्‍यांच्या सांगण्यावरुन तसेच गावकर्‍यांच्या दहशतीखाली असलेल्या वाहनधारकांनी त्यांना रुग्णालयापर्यंत सोडण्यास मनाई केली. वाहन न मिळाल्याने मंगला पवार व त्यांचे नातेवाईक जवळपास ६ किलोमीटर पायी चालत गेले. निळा फाट्यावरुन त्यांना वाहन मिळाले. परंतु, वसमत येथे रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मंगलाबाई पवार यांचा गर्भपात झाल्याचे सांगितले.

गावकर्‍यांच्या दबावामुळे प्रवाशी वाहनधारकांनी देखील पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकला असून या बहिष्काराबाबत यापूर्वीच पारधी महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शिला शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतरही पोलिसांनी खबरदारी न घेतल्यामुळे हा प्रकार घडला असून या प्रकारास जबाबदार असणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मंगला पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Intro:नांदेड जिल्ह्यात गावातील बहिष्कारामुळे मरणयातना; गर्भवतीला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झाला गर्भपात...!

नांदेड : आज एकविसाव्या शतकातही या बहिष्काराची जीवघेणी परंपरा सुरू आहे. जिल्ह्यातील महिपाल पिंपरी या गावात गावकर्‍यांच्या सांगण्यावरून प्रवाशी वाहनधारकांनी येथील पारधी कुटूंबियांवर बहिष्कार टाकल्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटात त्रास होत असतानाही तिला शहरात घेऊन गेले नाहीत. शेवटी तिला वाहनधारकांनी नकार दिल्याने जवळपास सहा किलोमीटर पायी चालावे लागले. महिलेचा गर्भपात झाला. प्रचंड मरणयातना सहन करत हे जग पाहण्याअगोदरच पोटचा गोळा तिला गमवावा लागला.Body: याप्रकरणी जबाबदार असणार्‍या संबंधीतावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मंगलाबाई पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.Conclusion:
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी महिपाल येथील महिला मंगलाबाई पवार यांच्या पोटात अचानक दुखत असल्याने त्यांनी पिंपरी महिपाल ते नांदेड व वसमत मार्गावर चालणार्‍या
प्रवाशी वाहनधारकांना रुग्णालयापर्यंत सोडण्याची मागणी केली. परंतु गावकर्‍यांच्या सांगण्यावरुन तसेच गावकर्‍यांच्या दहशतीखाली असलेल्या वाहनधारकांनी त्यांना रुग्णालया पर्यंत सोडण्यास मनाई केली. वाहन न मिळाल्याने मंगला पवार व त्यांचे नातेवाईक जवळपास ६ किलोमिटर पायी चालत गेले. निळा फाट्यावरुन त्यांना वाहन मिळाले. परंतु वसमत येथे रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मंगलाबाई पवार यांचा गर्भपात झाल्याचे सांगितले. गावकर्‍यांच्या दबावामुळे प्रवाशी वाहनधारकांनी देखील पारधी कुटूंबियांवर बहिष्कार टाकला असून या बहिष्काराबाबत यापुर्वीच
पारधी महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शिला शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतरही पोलीसांनी खबरदारी न
घेतल्यामुळे हा प्रकार घडला असून या प्रकारास जबाबदार असणार्‍या संबंधीतावर कारवाई करावी अशी मागणी मंगला पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
Last Updated : Jun 26, 2019, 11:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.