नांदेड : दोन दिवसापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत अशा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे, ज्याच्या पाठीमागे जबाबदारीचा गाडा असतानाही त्यांनी मोठी मेहनत घेऊन या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यातील एक उमेदवार अशा आहेत, ज्यांनी सासरची जबाबदारी संभाळत युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.
संसाराचा गाडा ओढत मिळवले मोठे यश : या उमेदवार आहेत पल्लवी गुट्टे. या शहर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक साहेबराव गु्ट्टे यांच्या सूनबाई आहेत. तर सेवा निवृत्त झालेले पोलीस उप-अधीक्षक संग्राम सांगळे यांची मुलगी. लग्नानंतर सासरची जबाबदारी अंगावर आल्यानंतर मुलींना शिक्षण करणे अवघड होत असते, असे म्हटले जाते. परंतु जर आपली आवड असली आणि इच्छा असली तर सर्व काही शक्य होते. कोणतेही समस्या अडचण आली तरी आपल्याला यश मिळते. याचे प्रचिती आपल्याला पल्लवी गु्ट्टे यांच्या यशातून दिसून येते. पल्लवीने संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळत युपीएससीत यश मिळवले आहे, हे कौतुकास्पद आहे. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पल्लवी यांनी ४५२ वा रँक मिळवला आहे. घर कामातून वेळ काढून पल्लवी यांनी परीक्षेत यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वजण कौतुक करत आहेत. नांदेड जिल्ह्यात युपीएससी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.
मेहनत पाहून पतीने दिली साथ : पल्लवी ही उच्चशिक्षित असून तिला सुरुवातीपासून अभ्यासाची आवड होती. काही तरी करुन दाखवायचे सर्वसामान्यांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न होते. त्यानुसार त्यांनी घरचा संसार सांभाळत युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. लग्नानंतर ही तिने परीक्षेची तयारी सोडली नाही. या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात पल्लवी यांना पती स्वरूप यांची देखील मोलाची साथ मिळाली. स्वरूप हे देखील उच्चशिक्षित असून इन्फोसिस कंपनीमध्ये कार्यरत आहेत. पल्लवी यांनी या पूर्वीदेखील त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली होती. मुलाखतीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. मात्र त्यात तिला यश मिळाले नाही. तरी ही त्यांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
परीक्षेत मिळवले यश : परत या परीक्षाच दुसरा प्रयत्न त्यांनी केला. या दुसऱ्या प्रयत्नात पल्लवीने २०२२ च्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश गाठले. युपीएससी परीक्षेत त्यांनी ४५२ वा रँक मिळवला. एकीकडे सुनबाई तर दूसरीकडे लेकीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केल्याने सांगळे आणि गुट्टे कुटुंबियांमध्ये आनंद साजरा केला जात आहे.
हेही वाचा -