नांदेड - शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
खरीपाची पेरणी करायची असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. काही शेतकऱ्यांनी तर धुळपेरणी देखील केली आहे. मात्र, शुक्रवारी रिमझिम बरसल्या सरींचा फायदा या धुळपेरणीला होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच हवामान खात्याने १-२ दिवसात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. शिवाय अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.