ETV Bharat / state

चुलत्याने पुतण्याला चाकूने भोसकले; उमरीत नागरिकांचा पोलिसांवर रोष - Nanded district

शेतीच्या वादातून 2010 मध्ये दिगंबर भरकड यांचा खुन करण्यात आला होता. या घटनेमुळे भरकड कुटुंबीयामध्ये मागील अनेक दिवसापासून वाद सुरू होता. ७ जूनला पुंडलिक विश्वंभर भरकड यांनी पुन्हा शेतीच्या वादातून रामेश्वर भरकड याचा चाकुने भोसकून खुन केला. या मारहाणीत पांडूरंग भरकड यांनाही मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. पांडूरंग भरकड यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

चुलत्याने पुतण्याला चाकूने भोसकले; उमरीत नागरिकांचा पोलिसांवर रोष
author img

By

Published : Jun 7, 2019, 11:35 PM IST

नांदेड - पूर्ववैमनस्यातून चुलत्याने पुतण्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास उमरीपासून जवळच असलेल्या गोरठा येथे घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परिणामी उमरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

चुलत्याने पुतण्याला चाकूने भोसकले

सायंकाळी उशिरापर्यंत उमरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे घटनेच्या एक दिवस आधी मृत रामेश्वर पोलीस स्थानकात अर्ज देण्यासाठी गेला होता. पोलिसांनी अर्ज न घेतल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. घटनेची माहिती कळताच पोलिसांचा प्रचंड फौजफाटा उमरी शहरात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेतीच्या वादातून 2010 मध्ये दिगंबर भरकड यांचा खुन करण्यात आला होता. या घटनेमुळे भरकड कुटुंबीयामध्ये मागील अनेक दिवसापासून वाद सुरू होता. ७ जूनला पुंडलिक विश्वंभर भरकड यांनी पुन्हा शेतीच्या वादातून रामेश्वर भरकड याचा चाकुने भोसकून खुन केला. या मारहाणीत पांडूरंग भरकड यांनाही मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. पांडूरंग भरकड यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मात्र, रामेश्वर भरकड यांचा मृतदेह उमरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पुंडलिक विश्वंभर भरकड, विश्वंभर गणेश भरकड व शांताबाई भरकड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

हे प्रकार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडले असल्याची तक्रार करत जमावाने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यांनी वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मृत रामेश्वर भरकड यांनी 6 जूनला पोलिसांना वादाबाबत पुर्व कल्पना दिली होती. जिवीतास धोका असल्याचे सांगत लेखी अर्ज देण्याचा प्रयत्न केला होता. आज सकाळी देखील मृताने पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यु सोळंके यांना अर्ज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी अर्ज घेतला नाही. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे रामेश्वर भरकड याचा बळी गेला असून जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला.

घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुदीराज, बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत उमरी शहरात तणावाचे वातावरण होते.

Intro:नांदेड - चुलत्याने केला पुतण्याचा खुन
उमरी तालुक्यातील गोरठा येथील घटना.

नांदेड : उमरी पुर्ववैमनस्यातून चुलत्याने पुतण्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी 11.30 च्या सुमारास उमरीपासून जवळच असलेल्या गोरठा येथे घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे उमरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांठया सोडल्या सायंकाळी उशीरापर्यंत उमरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे घटनेच्या एक दिवस पुर्वीच मयताने पोलिस स्थानकात अर्ज देण्याचा केला होता. पोलिसांनी अर्ज न घेतल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. घटनेची माहिती कळताच पोलिसांचा प्रचंड फौजफाटा उमरी शहरात तैनात करण्यात आला तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.Body:
सन 2010 मध्ये शेतीच्या वादातून दिगंबर भरकड यांचा खुन करण्यात आला होता. याघटनेमुळे भरकड कुटुंबियामध्ये मागील अनेक दिवसापासून वाद सुरु होता. दि. 7 जून रोजी पुंडलिक विश्वंभर भरकड यांनी पुन्हा शेतीच्या वादातून रामेश्वर भरकड याचा चाकुने भोसकून खुन केला. या मारहाणीत पांडूरंग भरकड यांचाही मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. पांडूरंग भरकड यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले.तर रामेश्वर भरकड यांचा मृतदेह उमरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पुंडलिक विश्वंभर भरकड, विश्वंभर गणेश भरकड व शांताबाई भरकड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.Conclusion:
दरम्यान सर्व प्रकार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडला असल्याची तक्रार करत जमावाने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. तसेच वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मयत रामेश्वर भरकड यांनी दि. 6 जून रोजी पोलिसांना वादाबाबत पुर्व कल्पना दिली होती. जिवीतास धोका असल्याचे सांगत लेखी अर्ज देण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी देखील मयताने पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यु सोळंके यांना अर्ज देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी अर्ज घेतला नाही. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे रामेश्वर भरकड याचा बळी गेला असून जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला.
घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे, भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुदीराज, बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. सायंकाळी उशीरापर्यंत उमरी शहरात तणावाचे वातावरण होते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.