ETV Bharat / state

राष्ट्रीय डेंग्यू दिन विशेष - 'अशी' घ्या डेंग्यूपासून बचावासाठी काळजी

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यू दिन रविवारी 16 मे रोजी साजरा केला जाणार आहे. मागील वर्षापासून सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना महामारीविरोधात लढत आहते. मात्र असे असताना देखील आरोग्य यंत्रणेकडून डेंगू या आजारावर नियमितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवले जात आहेत.

'अशी' घ्या डेंग्यूपासून बचावासाठी काळजी
'अशी' घ्या डेंग्यूपासून बचावासाठी काळजी
author img

By

Published : May 14, 2021, 10:51 PM IST

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यू दिन रविवारी 16 मे रोजी साजरा केला जाणार आहे. मागील वर्षापासून सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना महामारीविरोधात लढत आहते. मात्र असे असताना देखील आरोग्य यंत्रणेकडून डेंग्यू या आजारावर नियमितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

नागरीकांनी खबरदारी घेणे आवश्यक..!

डेंग्यू ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून, डासांची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.

साठविलेल्या पाण्यात होते डांसाची उत्पत्ती..!

सध्या उन्हाळा सुरू असल्याने, जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवतात. अशा साठवलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. जसे सिमेंट टाक्या, रांजन, प्लॉस्टिकच्या रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंड्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तु, टायर्स व कुलर इत्यादी. जास्त दिवस पाणी साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळेस दिडशे ते दोनशे अंडी घालतो. यातून या डासचा मोठा फैलाव होतो.

डेंग्यू आजाराची लक्षणे

या आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात मागील चार वर्षांची डेंग्यूची परिस्थिती पुढीलप्रमाणे

(घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने)
कंसाबाहेर डेंग्यूबाधित रुग्ण
सन 2018 - (1245) 378
सन 2019 - (1527) 473
सन 2020 (320) 97
तर एप्रिल 2021 अखेर (53) 19

नागरीकांनी अशी घ्यावी काळजी

भविष्यात डेंगी ताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावेत. पाणी साठवून ठेवणारे साधणे स्वच्छ करावीत. आपण ज्या भांड्यात अथवा टाकीमध्ये पाणी साठवतो त्याच्यावर घटट् झाकन ठेवावे. आंगणातील व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून गप्पी मासे पाळावेत. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरुन घेवून झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारूण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

डेंग्यूवर मोफत उपचार

डेंग्यू तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार हे या आजारापासून दूर ठेवण्यास आपल्याला मदत करतील. असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा - राज्य सरकारने देखील आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.