ETV Bharat / state

'विकेल ते पिकेल' या मंत्रातच शेतकऱ्यांची प्रगती

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, की इस्राईलसारखा आपल्या जिल्ह्याएवढा देश केवळ शेतीच्या प्रगतीतून संपूर्ण जगावर मोहिनी घालू शकतो. तिथले शेतकरी विपरीत परिस्थिती असूनही प्रगतीचे शिखर गाठू शकतात. याला कारण म्हणजे तिथे शेतकऱ्यांची एकसंघ असलेली शक्ती व उच्च तंत्रज्ञान !

विकेल ते  पिकेल अभियान
विकेल ते पिकेल अभियान
author img

By

Published : Dec 9, 2020, 10:18 PM IST

नांदेड - निसर्गाच्या असमतोलाशी सतत संघर्ष करीत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी स्वत: शेतीत थांबून लक्ष दिले तरच त्याला त्यातून सावरता येते. त्याच्या जर हाती काही लागले नाही तर समाजाला अन्नाशिवाय जगता येणार नाही. शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकेल या मंत्राचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. ते जिल्हापरिषदेच्या कार्यशाळेत बोलत होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्‍हा नियोजन सभागृहात ‘विकेल ते पिकेल’ अभियानातंर्गत बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत जिल्‍हास्‍तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर म्हणाल्या, की जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी स्वत: मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.

हेही वाचा-किमान आधारभूत किमतीवर लेखी आश्वासन देण्यास सरकार तयार

विकेल ते पिकेल प्रगतीची दारे खुली करेन-डॉ.विपीन

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, की इस्राईलसारखा आपल्या जिल्ह्याएवढा देश केवळ शेतीच्या प्रगतीतून संपूर्ण जगावर मोहिनी घालू शकतो. तिथले शेतकरी विपरीत परिस्थिती असूनही प्रगतीचे शिखर गाठू शकतात. याला कारण म्हणजे तिथे शेतकऱ्यांची एकसंघ असलेली शक्ती व उच्च तंत्रज्ञान ! आपल्या शेतकऱ्यांनीही 'विकेल ते पिकेल' या भावनेतून एकसंघ होऊन गटशेतीच्या माध्यमातून, एफपीओच्या माध्यमातून शेतीला आधुनिक व व्यावसायिकतेची जोड दिली तर आपणही कुठे कमी पडणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पॅकेजिंगच्या कौशल्यासह तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरती जागा उपलब्ध करू, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी  विपीन इटनकर
जिल्हाधिकारी विपीन इटनकर

हेही वाचा-पतमानांकनात सुधारणेचा येस बँकेला फायदा; शेअरच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर म्हणाल्या, की शेतीशी निगडीत शासनस्तरावर अनेक विभाग आहेत. या विभागांसहीत आता महिला विकास, केबीके, कापूस उत्पादक संघटना, प्रगतशील शेतकरी, गटशेती करणारे विविध गट या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

‘विकेल ते पिकेल’ अभियान
‘विकेल ते पिकेल’ अभियान
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती-कार्यशाळेला नाबार्ड, स्मार्ट प्रकल्प, एक जिल्हा एक उत्पादन, अन्न प्रक्रिया योजना, पोकरा अंतर्गत शेतकरी गट व उत्पादक कंपन्या प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज मंजुरीसाठी लागणारे कागदपत्र आदीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी नांदेड जिल्ह्यातून आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.