नांदेड - नांदेड भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी गैरहजर राहून व उस्मानाबाद व औरंगाबादच्या नामांतरास पाठींबा दिल्या. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये बोलत ( pratap patil chikhalikar offer ashok chavan join bjp ) होते.
प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत. माजी मंत्री अशोक चव्हाण हे शिंदे सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी स्वतः सह जिल्ह्यातील चार आमदार गैरहजर ठेवून व औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामातरास पाठींबा देत अप्रत्यक्षरित्या भाजपाला पाठिंबाच दिलाय. त्यामुळे त्यांचे आभारच मानले पाहिजेत. तसेच, ते जर भाजपात आले तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे मी स्वागत करेन, असेही पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, खासदार चिखलीकर यांच्या या ऑफरवर अशोक चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यांच्या प्रतिक्रियाकडे सर्वांचं लक्ष लागलेय. अशोक चव्हाण काँग्रेसचे मराठवाड्याचे महत्वाचे नेते मानले जातात.
हेही वाचा - Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरुन शरद पवारांनी झटकले हात; म्हणाले, 'याची कल्पना...'