ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात मी आणि एसपी दोनच गुंड, जिल्हाधिकाऱ्यांचे वक्तव्य - nanded collector vipin itankar

आम्ही दोघे गुंड राहिल्यास दुसरे गुंड तयार होणार नाहीत, असेही ते म्हणाले. डॉ. विपीन इटनकर यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

nanded collector vipin itankar controversial statement he said sp and collector are only 2 goons in district
नांदेड जिल्ह्यात मी आणि एसपी दोनच गुंड, जिल्हाधिकाऱ्यांचे वक्तव्य
author img

By

Published : Mar 1, 2020, 4:40 AM IST

नांदेड - जिल्ह्यात फक्त दोनच गुंडे असतात त्यातील पहिला गुंडा म्हणजे जिल्हाधिकारी आणि दुसरा गुंड म्हणजे पोलीस अधीक्षक, असे वक्तव्य नांदेडचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शनिवारी नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निरोप देण्यात आला. तर यासोबत नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे स्वागतही याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना इटनकर यांनी हे वक्तव्य केलं.

आम्ही दोघे गुंड राहिल्यास दुसरे गुंड तयार होणार नाहीत, असेही ते म्हणाले. डॉ. विपीन इटनकर यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची तुलना थेट गुंडांशी केल्याने नांदेड जिल्ह्याचा कारभार येणाऱ्या काळात कसा चालेल, याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. आता जिल्हा लोकशाही मार्गाने चालणार की ठोकशाही मार्गाने चालणार असाही प्रश्न नांदेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

लोकशाहीत जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख असतो. प्रमुख व्यक्तीनेच गुंडाची भाषा केल्याने, सुज्ञ नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे गुंडाच्या भूमिकेत शिरुन ते कसे काम करणार असाही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व वाळू माफिया यांचा हैदोस कमी होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.