नांदेड: फुलाबाई चिनकीराम मोरे वय ६५, राहणार वाधी धानोरा तालुका जिंतूर आणि नबीबाई प्रकाश पजई वय ४०, राहणार वाघी धानोरा, तालुका जिंतूर असे मयत महिलांची नावे आहेत. दिंडीप्रमुख देशमुख यांनी सकाळी माहूरच्या पोलिस ठाण्यात दोन महिला हरवल्याची माहिती दिली होती. काही वेळानंतर पांडवलेणी तलावाच्या काठावरून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना एका महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. पोलिसांना फोनद्वारे माहिती दिल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या साहित्याची तपासणी केली.
मतदान कार्डमुळे ओळख: तलावाच्या किनाऱ्यावर महिलेचे मतदान कार्ड मिळून आले. मतदान कार्डावरील नावानुसार महिलेचे नाव फुलाबाई चीनकीराम मोरे असे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या महिलेसोबत तिची मुलगी नबीबाई प्रकाश पजई ही देखील सोबत होती. असे सोबत आलेल्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पोहणाऱ्यांनी तलावात पुन्हा पाहणी केली, तेव्हा दुसऱ्या महिलेचाही मृतदेह आढळला. मयत नबीबाई यांना तीन मुली आहेत. त्यांचे मतदान कार्ड तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या तिच्या साहित्यात भेटल्याने ओळख होण्यास मदत झाली. निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्रीधर जगताप तपास करीत आहेत.
चारठाण्यातून निघाली होती दिंडी: जितूर तालुक्यातील चारठाणा येथून ३ फेब्रुवारी रोजी ७० ते ८० नागरिकांना घेऊन दिंडी माहूरकडे निघाली होती. १० फेब्रुवारी रोजी ही दिंडी माहूर येथे पोहोचली. दुपारी ३ वाजता ही दिंडी परत निघणार होती. स्नानासाठी गेलेली मयत महिला व तिची मुलगी बराच वेळ होऊनही न परतल्या शोधाशोध केली. तेव्हा तलावात मृतदेह आढळला.
पोहण्यासाठी गेलेल्या दोन मजुरांचा मृत्यू: या आधीही अकोला येथे मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मजुरांचा कान्हेरी ते एरंडा रोडवरील खोल तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना होती. कान्हेरी येथील कारखान्यात काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांपैकी 28 वर्षीय अनिल शन्नीलाल उईके राहणार ब्रजपुरा तालुका जुन्नारदेव जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश आणि 25 वर्षीय पुष्पेंद्र कनस कुमरे राहणार पसलाई, जिल्हा बैतुल, मध्य प्रदेश हे दोघे मित्रांसोबत कान्हेरी ते एरंडा रोडवरील तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहण्याच्या वेळी ते दुरवर पोहत गेले आणि तलावात अचानक बेपत्ता झाले होते. यावेळी त्यांच्या सोबतचे दोन्ही मित्र घाबरत पाण्यातून बाहेर आले आणि याबाबत कुटुंबीय आणि इतर लोकांना माहिती दिली होती.
हेही वाचा: Nanded Accident एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात ९ प्रवाशी जखमी