नांदेड- शहरातील हिमायतनगर शाळेत दहावीची परीक्षा सुरू असताना एका व्यक्तीने महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडली. शेख नदीम शेख जलील, असे वाद घालणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
सोमवारी दुपारी १२ वाजता महिला पोलीस कर्मचारी कोमल कागणे या हिमायतनगर शाळेत कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान, आरोपी शेख नदीम शेख जलील हा तेथे आला, तेव्हा कागणे यांनी त्याला दहावीची परीक्षा सुरू आहे, तू येथे कशाला आलास? बाहेर जा, असे सांगितले. तेव्हा आरोपीने उद्धटपणे बोलून तू तुझे काम कर, काय करायचे ते कर, असे धमकावले. याप्रकरणी कोमल कागणे यांनी दिलेल्या माहितीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात शेख नदीम शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे करत आहेत.
हेही वाचा- अज्ञात व्यक्तीने उद्ध्वस्त केली केळी अन् टरबुजाची शेती