नांदेड : जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या निष्काळजी पणाचा फायदा घेत बीआरएस राज्यातील राजकारणात प्रवेश करीत आहे. कर्नाटक, बेळगाव सीमा प्रश्न तसेच सीमा भागातील गावांचा प्रश्न सोडवण्यात राज्यातील सरकार अपयशी ठरल्याचा ठपका बीआरएस नांदेडमधील जनतेमध्ये मांडणार आहे. मराठी भाषिकांवर अन्याय, पाणी प्रश्नापासून ते रेल्वे प्रश्नापर्यंत बीआरएस पक्षाच्या वतीने सोडवण्याचे आमिष देण्यात येणार आहे. मात्र, या सभेला नांदेड जिल्ह्यातील एकही राजकीय पुढारी विरोध करण्यास तयार नसून मूग गळून गप्प बसल्याची टीका मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी केली आहे.
पाण्याचा प्रश्न गाजणार : गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्रात 50 टक्के भाग नदी खोऱ्याने व्यापला आहे. गोदावरी पाण्याच्या झालेल्या वाटपा संदर्भात 31 टक्के पाण्याचा हिस्सा देण्याची शिफारीश करण्यात आली होती. मात्र, बीआरएस सरकारच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्राबद्दल दुपटी भूमिका घेणाऱ्या सरकारचा मनसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. आंध्रसह, तेलंगणात गोदावरी खोऱ्याचे भौगोलिक क्षेत्र केवळ 23 टक्के असताना आंध्रप्रदेशला 30 पाणी देण्यात येते. या पाणी वाटपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मनेसेने या सभेला विरोध केला आहे. तसेच महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात पाणी प्रश्नावर बीआरएस सरकारच्या भूमीकेबद्ल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
मनसेचा इशारा : आंध्र, तेलंगणा सरकार बाबळी पाणी प्रश्न बाबत दुटप्पी भूमीका घेत असून त्यांना नांदेडमध्ये पाय ठेऊ देणार नाही असे मनसेचे जिल्हा अध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची पहिली सभा उधळून लावून काळे झेंडे दाखवण्यात येतील असा इशारा जहागीरदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. बाभळी बंधारा पाणी विषयावर पाठपुरावा करून देखील तोडगा निघाला नसून महाराष्ट्र जनतेच्या भावना दुखल्या आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
बीआरएसचे सीमावर्ती भागात शक्ती प्रदर्शन : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यासाठी उद्या नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या तयारीसाठी बीआरस पक्षाचे नेते सीमावर्ती भागात मोठे शक्तिप्रदर्शन कराता आहेत. धर्माबाद, बिलोली तालुक्यात नव्या कोऱ्या शेकडो बीआरएसचे नेते दाखल झाले आहेत. बीआरस पक्षाचे आमदार खासदार या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले असून सभेला गर्दी जमवण्याची तयारी सुरु आहे.