ETV Bharat / state

'अब अशोक चव्हाण को आराम दीजिये'; भाजपचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन - Maharashtra Assembly Elections 2019

'अब अशोक चव्हाण को आराम दीजिये और गोरठेकर साहब को काम दीजिये' असे आवाहन भाजपचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले. भोकर मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकरांच्या मुदखेड येथील प्रचार सभेत बोलत होते.

भाजपचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा
author img

By

Published : Oct 11, 2019, 1:50 AM IST

नांदेड- 'आदर्श' हे नाव चांगल्यासाठी घेतले जाते मात्र, अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटीत भ्रष्टाचार करून 'आदर्श' नावालाही बदनाम केले. आम्ही भाजपच्यावतीने स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार दिला आहे. 'अब अशोक चव्हाण को आराम दिजीये और गोरठेकर साहब को काम दिजीये' असे आवाहन भाजपचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले.

मुदखेड येथील प्रचार सभेत बोलताना भाजपचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा

भोकर मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकरांच्या मुदखेड येथील प्रचार सभेत बोलत होते. अशोक चव्हाणांनी त्यांनी संसदेत किती प्रश्न मांडले. नांदेडला त्यांनी काय दिले. मी आरोग्यमंत्री असताना विष्णुपूरी येथील रूग्णालयासाठी ४४ कोटी रुपये दिले. नांदेड-वर्धा, नांदेड-बिदर रेल्वेमार्ग आम्ही मंजूर केला. जिल्ह्यात सहा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले. या महामार्गामध्ये एका किलोमीटरसाठी तरी चव्हाण यांचे योगदान आहे का? हे त्यांना विचारले पाहीजे, असे नड्डा यांनी मतदारांना सांगितले.

हेही वाचा - देशाल सक्षम करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा - जमयांग न्यामग्याल

या निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणे आवश्यक आहे. मागील पंधरा वर्षांत राज्यात खुर्चीचा खेळ करून आळीपाळीने भ्रष्टाचार केला जात असे. मात्र, संपूर्ण पाच वर्ष स्थिर सरकार देऊन देवेंद्र फडणवीस यांनी यांनी राज्याचा विकास केला.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणून शेतकऱ्यांचा सन्मान वाढवण्याचे काम मोदींनी केले. राज्यातील देवेंद्र सरकारने देखील पारदर्शक कर्जमाफी देऊन वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. आठ कोटी महिलांना उज्वला योजनेतून गॅस दिला. आयुष्यमान योजनेतून आरोग्य विषयक सुविधांचा लाभ दिला. दहा कोटी घरात वीज पोहोचवली. येणाऱ्या काळात देशाचा व राज्याचा सर्व बाबतीत विकास होणार आहे, अशी नड्डा यांनी भाजप सरकारची स्तुती केली.

हेही वाचा - शिवस्मारकाची घोषणा झाली मात्र इंचभरही बांधकाम नाही - शरद पावार

महाराष्ट्रतील तळागाळातील प्रवर्गाला प्रवाहात आणण्याचे काम मोदी आणि फडणवीस यांनी केले आहे. मंदीच्या लाटेतही नागरिकांच्या विकासाच्या योजना बंद केल्या नाहीत. राज्याचा विकासाचा रथ पुढे चालू ठेवण्यासाठी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहन नड्डा यांनी केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बापूसाहेब गोरठेकर, राजेश पवार, गंगाधर जोशी हे उपस्थित होते.

Intro:Body:

gfhgfh

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.