ETV Bharat / state

गुरुद्वाराची लंगरसेवा बनली लाखो गरजूंचा आधार, दररोज 4 लाख लोकांना जेवण - गुरुद्वाराची लंगरसेवा

सचखंड गुरुद्वाराची लंगरसेवा आता लॉकडाऊनच्या काळात गरजू लाखो लोकांचा आधार बनली आहे. दररोज 4 लाख लोकांना जेवण पुरवण्याचे काम लंगरसाहिबच्या माध्यमातून होत आहे.

nanded
गुरुद्वाराची लंगरसेवा बनली लाखो गरजूंचा आधार
author img

By

Published : Apr 19, 2020, 6:16 PM IST

नांदेड - शीख समाजाची दक्षिण काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वाराची लंगरसेवा आता लॉकडाऊनच्या काळात गरजू लाखो लोकांचा आधार बनली आहे. दररोज 4 लाख लोकांना जेवण पुरवण्याचे काम लंगरसाहिबच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अन्नदान आणि सर्वात मोठी लंगरसेवा झाली आहे.

गुरुद्वाराची लंगरसेवा बनली लाखो गरजूंचा आधार

लॉकडाउनच्या काळात दररोज गोरगरीब लोकांची पोटाची खळगी भरण्याचे मोलाचे कार्य गुरुद्वारालंगर साहिबच्या माध्यमातून अविरतपने सुरू आहे. अन्नदानाची ही लंगरसेवा, कारसेवकांचा सेवाभाव मानवतेची शिकवण देणारी आहे. लंगरमध्ये प्रत्येकजण सेवाभावाने हे कार्य करत आहे. संकटसमयी गुरुद्वारा, गुरुद्वारा लंगरसाहिब नेहमी धावून येते. ही गुरु गोविंदसिंगांची पवित्र भूमी आहे.

nanded
गुरुद्वाराची लंगरसेवा बनली लाखो गरजूंचा आधार
कशी असते लंगर सेवा? दररोज 4 हजार किलो तांदूळ, दोन हजार किलो डाळ शिजवली जाते. तर साडे तीन लाख किलो पीठाच्या चपात्या बनवल्या जातात. २४ तास येथे शीख बांधव सेवा देतात. गुरुद्वाराच्या माध्यमातून ६५ केंद्र सुरू असून १२ वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आहेत. नांदेड शहरासह ग्रामीण भागात चार लाख लोकांना जेवण दिले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.