ETV Bharat / state

स्पेशल; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचे नाफेडकडे हरभऱ्याचे 30 कोटी अडकले

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संघ यांच्याकडे १ हजार ४२८ शेतकऱ्यांनी २३ हजार ५०२ क्विंटल हरभरा जमा केला. त्यापैकी ८८४ शेतकऱ्यांना हरभऱ्याची रक्कम अदा करण्यात आली, तर आणखी ५४४ शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे.

author img

By

Published : Aug 5, 2020, 5:01 PM IST

farm
हरभरा उत्पादक शेतकऱयांचे अडकले पैसे

नांदेड - जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, किनवट, हदगाव, बिलोली, देगलूर तालुक्यातील ३ हजार ५२३ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे २९ कोटी ८७ लाख २१ हजार २८० रुपये नाफेडकडे थकले आहेत. खरिपासाठी लागणाऱ्या लागवडीसाठी शेतकऱ्यांचे पैसे अडकल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागच्या महिन्यात १५ जूनपर्यंत शासनाच्या केंद्रावर हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिना होऊन गेला तरी अद्यापपर्यंत हरभऱ्याचे पैसे मिळाले नाहीत.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संघ यांच्याकडे १ हजार ४२८ शेतकऱ्यांनी २३ हजार ५०२ क्विंटल हरभरा जमा केला. त्यापैकी ८८४ शेतकऱ्यांना हरभऱ्याची रक्कम अदा करण्यात आली, तर आणखी ५४४ शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड तालुका खरेदी विक्री संघात ६४३ शेतकऱ्यांनी ११०७९ .५० क्विंटल हरभरा जमा केला. त्यापैकी ४४३ शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात आली, तर तेथील २०० शेतकरी अद्यापही हरभऱ्याच्या पैशापासून वंचित आहेत.

किनवटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत २२ हजार ३८८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापैकी ७०१ शेतकरी अद्यापही खात्यात पैसा येईल म्हणून वाट पाहत आहेत. हदगाव तालुक्यातील ३२२५१.५० क्विंटल हरभऱ्याची खरेदी १५ जूनपर्यंत करण्यात आली . त्यापैकी ७२४ शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात आली. परंतु तेथील ११२६ शेतकरी अद्यापही हरभऱ्याच्या पैशाची वाट पाहत आहेत. बिलोली तालुक्यातील कासराळी येथे असलेल्या तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर १९ हजार ७७२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. बिलोली तालुक्यातील ११७६ शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री केला. त्या ठिकाणी ६०८ शेतकऱ्यांना पैसे मिळाले. परंतु अजूनही ५६८ शेतकरी पैशाची वाट पाहत आहेत.

बिलोली तालुक्यात पैशाअभावी शेतकरी खासगी सावकाराकडे कर्जासाठी चकरा मारत आहेत. देगलूर तालुक्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सहकारी संस्थेअंतर्गत ६९१ शेतकऱ्यांना हरभऱ्याचे पैसे मिळाले परंतु अजूनही ३८४ शेतकरी नाफेडकडून पैसे येतील म्हणून वाट पाहत आहेत.

नांदेड, मुखेड, किनवट, हदगाव, बिलोली, देगलूर तालुक्यातील हजारो शेतकरी दररोज सकाळी उठल्यापासून हरभरा विक्री केलेल्या केंद्रावर चकरा मारत आहेत. हरभरा विकून दीड महिना झाला. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरच सोयाबीन न उगवल्याने दुबार पेरणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांवर कर्ज होऊन बसले आहे.

जिल्ह्यात 16 तालुके असून त्यापैकी सहा तालुक्यातील शेतकऱ्यांची ही अवस्था बिकट आहे. नाफेडकडे २९ कोटी ८७ लाख २१ हजार २८० रुपये थकले असल्याने ही रक्कम कधी येईल, या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. पेरणी करत असताना शेतकऱ्यांना पैसे लागतात. परंतु यंदा शासनाकडे हरभरा विकून अद्यापही पैसे न आल्याने पेरणी करताना उधार, उसनवारी केलेल्या शेतकऱ्यांना आता फवारणीसाठी उधारीमध्ये माल देण्यास कोणीही तयार नाहीत. शेतकऱ्यांची ही स्थिती शासनाच्या उदासीन धोरणामुळे झाली असल्याची टीका शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकलेले असताना एकही पक्षाचा नेता यावर बोलायला तयार नाही. जिल्ह्यातील केवळ सहा तालुक्यात ३० कोटी रुपये शेतकऱ्यांचे शासनाकडे थकले आहेत. त्यांनी या शेतकऱ्यांचा विचार करून तत्काळ पैसे अदा करावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.