ETV Bharat / state

ETV Bharat Impact : संपूर्ण देशात तिरंगा पुरविणाऱ्या नांदेडच्या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रासाठी २५ कोटींचा निधी - नांदेड येथील राष्ट्रध्वज निर्मिती केंद्र

राष्ट्रध्वज तिरंग्याची देशभरात निर्यात करणाऱ्या नांदेड येथील राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रासाठी ( National Flag Making Center Nanded ) राज्य सरकारने अर्थसंकल्पात ( Maharashtra Budget 2022 ) २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. ईटीव्ही भारतने याबाबत सर्वप्रथम लक्ष वेधून केंद्राची समस्या मांडली होती.

राष्ट्रध्वज निर्मिती
राष्ट्रध्वज निर्मिती
author img

By

Published : Mar 11, 2022, 8:43 PM IST

Updated : Mar 12, 2022, 11:08 AM IST

नांदेड : राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या देशभरातील निवडक केंद्रांमध्ये समावेश असलेली नांदेड ( National Flag Making Center Nanded ) येथील ऐतिहासिक संस्था मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या ( Marathwada Khadi Gramodyog Samiti ) वास्तुचा कायापालट करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात ( Maharashtra Budget 2022 ) आज झालेल्या या घोषणेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केले आहे. चव्हाण यांनी १६ ऑगस्ट २०२१ रोजी या संस्थेला भेट देऊन पाहणी केली होती.

महत्वाच्या ठिकाणी नांदेडमधील झेंडे

नवी दिल्लीचा लाल किल्ला, मुंबईचे मंत्रालय अशा देशभरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय वास्तुंवर या संस्थेने तयार केलेले राष्ट्रध्वज फडकवले जातात. संस्थेची पाहणी केल्यानंतर चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या संस्थेची वास्तू व परिसराचा कायाकल्प करण्यासाठी आराखडा तयार करून घेतला. नवीन आराखड्यात कार्यालयीन इमारत, निर्मिती केंद्र, विक्री केंद्र आदींचा समावेश असून, या ठिकाणी खादीचे महत्त्व सांगणारे कायमस्वरूपी प्रदर्शन देखील उभारले जाणार आहे. हे केंद्र एक शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत ईटीव्ही भारत ने वृत्त प्रसारीत करून शासनाचे लक्ष्य वेधले होते.

निर्णयाबद्दल मानले आभार

स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी १९६७ मध्ये स्थापन केलेल्या व त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी संगोपन केलेल्या या संस्थेचा कायापालट करण्याच्या निर्णयाबद्दल नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे हे केंद्र केवळ खादी उत्पादनांचे निर्मिती केंद्र न राहता पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे स्थळ म्हणून नावारूपास यावे, असाच आमचा प्रयत्न राहणार असल्याचे चव्हाण पुढे म्हणाले. या निर्णयानंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष ईश्वरराव भोसीकर यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले.

देशात अवघे दोनच केंद्र

देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठादेशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावरील फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अखंड देशभरात नांदेडहून राष्ट्रध्वज पाठवला जातो. देशात कर्नाटकमधील हुबळी (जि. धारवाड) व नांदेड या दोनच ठिकाणाहूनच देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठा होतो. नांदेड शहरात मराठवाडा खादी ग्रामउद्योग समितीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. विविध दहा आकाराचे राष्ट्रध्वज इथे तयार केले जातात. सदरील राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे उदगीर (जि. लातूर) येथून मागविले जाते. हे राष्ट्रध्वज बनविताना सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. कापड, दोरी, लाकूड, शिवणकाम आदी बाबत बारकावे तपासूनच तिरंगा ध्वज पुढे पाठविला जातो. देशातील महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तेलंगणा, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, चंदिगढ, पॉंडेचरी यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यात तिरंगा ध्वज पाठविला जातो.

'ईटीव्ही भारत' ने वृत्त प्रसारित प्रशासनाचे लक्ष्य वेधले...!

यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' ने वृत्त प्रसारित करून शासनाचे लक्ष्य वेधले होते. खुद्द पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देऊन सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले होते. २५ कोटींची मदत जाहीर झाल्यानंतर या संस्थेचे रूप पालटणार आहे. याचा संस्थेच्या पदाधिकारी यांनी आनंद साजरा केला.

Last Updated : Mar 12, 2022, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.