ETV Bharat / state

रेल्वेत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना रेल्वे पोलिसांनी केले अटक

नांदेड रेल्वे पोलिसांनी लुटमार करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पुढील तपास नांदेड रेल्वे पोलीस करत आहेत.

four-thieves-arrested-by-nanded-railway-police
रेल्वेत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना रेल्वे पोलीसांनी केले अटक केली
author img

By

Published : Mar 9, 2020, 9:34 AM IST

Updated : Mar 9, 2020, 9:45 AM IST

नांदेड - रेल्वे पोलिसांनी लुटमार करणाऱ्या चौघांना पकडण्यात यश आले आहे. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेत नांदेड रेल्वे पोलिसांनी रेकॉडवरचे गुन्हेगार शोधले असून या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

रेल्वेत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना रेल्वे पोलीसांनी केले अटक केली

दोन दिवसांपूर्वी नांदेड रेल्वे पोलिसांनी परभणीतील परसावत नगरमधील रहिवासी फुलाबाई रमेश जाधव (वय.३०) व रमेश दशरथ जाधव (वय.३२) यांना पकडले. त्यांच्याकडून दहा हजारांचा सॅमसंग मोबाईल जप्त केला. रमेशची कसून चौकशी केली असता त्याने औरंगाबादमध्ये एक खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात औरंगाबादमध्ये कलम ३०२, २०१ अन्वये तर नांदेड रेल्वे पोलिस ठाण्यात कलम ३९२, ३४ दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे पोलीस हेड काँस्टेबल पराळे, पुष्पा अशोक यांनी केली.

लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी शिवाजी बालाजी सोनकांबळे (वय.२१) या तरुणाकडूनही १५ हजारांचा मोबाईल जप्त करून नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात कलम ३९२ दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सह पोलीस निरीक्षक केंद्रे, पोलीस काँस्टेबल कराळे, कैकाडे यांनी केली.

जुन्या नांदेडमधील मणियार गल्लीतील वसीम खान, असीम खान (वय.३०) या तरुणाकडून रेल्वे पोलिसांनी १० हजारांचा मोबाईल जप्त करून कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एपीआय केंद्रे, पोलीस रुपेश चौधरी, कैकाडे, मोरफुले यांनी केली. या सर्व आरोपींना औरंगाबादच्या रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना कोठडी देण्यात आली. या सर्व कारवाया पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Last Updated : Mar 9, 2020, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.