नांदेड : अर्धापूर-वसमत रस्त्यावरील कामठा पाटीजवळ टाटा सुमो आणि ट्रकचा अपघात झाला. यात टाटा सुमोमधील पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वसमत फाटा महामार्ग पोलिसांनी दिली. हा अपघात रविवारी (दि.२०) घडला. जखमींना उपचारासाठी नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाच जखमी एक गंभीर
या अपघाताबाबत वसमतफाटा महामार्ग पोलीस पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, वसमतकडून मालवाहतूक करणारा ट्रक (जे.जी. 31 टी 0059) अर्धापूरकडे येत असताना अर्धापूरकडून एक जीप (डब्ल्यु बी 52 सी 2804) वसमकडे जात असताना कामठा पाटीजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला. या आपघातात टाटा सुमोमधील चांदू राजाराम कांबळे (वय ५० रा.मालेगाव जि.नांदेड), पवित्र पागल सरदार (वय ४५ रा. तलपुष्पानगर ता. अरजुनी जि. गोंदिया), दिलीप माधवराव नैताम (वय २९ रा. बाेरसाेला ता. अरजुनी जि.गाेदिया), जयदेव लक्ष्मन कडॅम (वय ३२ रा. बाेरटाेला जि. गाेंदिया), संताेष पंडितराव गायकवाड (वय ३१ रा. भास्कर कॉलनी मालेगाव ता. अर्धापूर) हे जखमी झाले आहेत.
महामार्ग पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल
या अपघाताची माहिती मिळताच वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस कर्मचारी व अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दखल केले. या जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक शेख रहेमान यांनी दिली. या अपघातात ट्रक पलटी झाला असून टाटा सुमोचेही मोठे नुकसान झाले. अपघातात होताच बघ्यांची गर्दी झाली होती. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या रस्त्याचे काम सुरू असून जागोजागी अर्धवट अवस्थेमध्ये कामे असल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अर्धापूर-वसमत रस्त्यावर कामठा पाटीजवळ ट्रक-जीपचा अपघात; पाच जखमी - अर्धापूर-वसमत ट्रक-जीपचा अपघात
टाटा सुमोमधील पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वसमत फाटा महामार्ग पोलिसांनी दिली. हा अपघात रविवारी (दि.२०) घडला. जखमींना उपचारासाठी नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.