सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी - बिलोली न्यायालय न्यूज
शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला बिलोली न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सय्यद रसुल असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आरोपी शिक्षक सय्यद रसूल याला २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.

नांदेड - बिलोली तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला बिलोली न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सय्यद रसूल असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याने सहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : तुरुंग प्रशासनाने दोषींना विचारली शेवटची इच्छा
आरोपी शिक्षक सय्यद रसूल याला २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याला रामतीर्थ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. रामतीर्थ पोलिसांनी गुरुवारी (२३ जानेवारी) सय्यद रसूलला बिलोलीच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी शिक्षक अद्याप फरार आहेत.
नांदेड : सहावीतील विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पाच दिवसाची पोलिस कोठडी.
बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आपल्याच शाळेतील विद्यार्थीनिवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षक सय्यद रसुल याला बिलोली न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.Body:
नराधम अत्याचारी शिक्षक सय्यद रसूल याला बाललैंगिक अत्याचार प्रकरनी दिनांक २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्याला रामतीर्थ पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले होते. रामतीर्थ पोलिसांनी आज दिनांक २३ जानेवारी रोजी आरोपी सय्यद रसुल याला बिलोली च्या न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीला दिनांक २८ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Conclusion:दरम्यान या प्रकरणातील अन्य तीन आरोपी शिक्षक अद्यापही मोकाट आहेत.