नांदेड- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा बंद करण्यात आले आहे. याठिकाणी सध्या कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्ड व लंगरसाहिबचे मार्चपासूनचे वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स. मनबिरसिंघ ग्रंथी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गुरुद्वारा बोर्ड व लंगरसाहिबने अनेकदा सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेताल आहे. गेल्या ५० वर्षांच्या काळात शहराच्या विकासासाठी शेकडो एकर जमिन सरकारला दिली आहे. याबरोबरच गरजू नागरिकांना अनेक दिवस कोविड काळात लंगरचा पुरवठा करण्यात आला. श्री दशमेश हॉस्पिटल व बाबा निधानसिंघ हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी व औषधोपचार केला जातो. या सर्व बाबींची दखल घेऊन वीज वितरण कंपनीने व शासनाने गुरुद्वारा बोर्ड तसेच लंगरसाहिबचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा- संभाजीराजे छत्रपतींना दिलेली वागणूक अयोग्य - शिवेंद्रसिंहराजे भोसले