नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग सुरूच असून चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 2 हजार 669 अहवालापैकी 566 अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 255, तर अँटिजेन तपासणीद्वारे 311 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 26 हजार 957 एवढी झाली आहे. शनिवार 13 मार्च रोजी सिडको नांदेड येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा कोविड रुग्णालयात तर वजिराबाद नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 616 एवढी झाली आहे.
52 रुग्णांची प्रकृती अतीगंभी -
रविवारी 2 हजार 669 अहवालापैकी 2 हजार 21 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 26 हजार 957 एवढी झाली असून यातील 23 हजार 741 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 2 हजार 380 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 52 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.06 टक्के -
आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 130, किनवट कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 44, हदगाव कोविड रुग्णालय 4, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 207 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.06 टक्के आहे.
जिल्ह्यात 2 हजार 380 रुग्णांवर औषधोपचार सुरु -
जिल्ह्यात 2 हजार 380 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 93, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 79, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 38, किनवट कोविड रुग्णालयात 40, मुखेड कोविड रुग्णालय 40, हदगाव कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 13, महसूल कोविड केअर सेंटर 140, देगलूर कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 374, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 361, खाजगी रुग्णालय 189 रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा - वचपा काढला! इंग्लंडला दणका; मालिकेत १-१ बरोबरी, दुसऱ्या टी-२०त भारताचा ७ गडी राखून विजय