नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त दिल्ली येथे दोन ऑक्टोबरला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडचे कमाडिंग अधिकारी कर्नल जी.आर.के.शेषा साई यांच्यामार्फत होत असलेल्या सायकल रॅलीचा शुभारंभ पोलीस परेड मैदानावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते ध्वज दाखवून सोमवारी करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, रॅलीसाठी बटालियन मधील ६५० छात्रसैनिक व एनसीसी अधिकारी उपस्थित होते. देशातील्या सर्व राज्यातील राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयाअंतर्गत स्वच्छता सायकल रॅलीचे आयोजन होत आहे. एक रॅली पुडूचेरीपासून तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून व दुसरी रॅली केरळ व कर्नाटक राज्यातून लातूर येथील ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर येथून निघाली आहे. या दोन्ही सायकल रॅली बॅटन घेऊन २५ ऑगस्टला सायंकाळी नांदेड येथे पोचल्या. या दोन्ही बॅटन एनसीसी संचालनालयाच्या औरंगाबाद ग्रुप अंतर्गत येणाऱ्या ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड यांच्या सुपूर्द करतील. अशा प्रकारे बाकी राज्यातून छात्रसैनिक बॅटन घेऊन या महोत्सवात पोहोचतील व दोन ऑक्टोबरला दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी होतील.
सोमवारी सकाळी पोलीस कवायत मैदानात ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड जिल्ह्यातील सर्व छात्रसैनिक एकत्र आले होते. या बटालियनचे छात्र सैनिक या दोन्ही बॅटन घेउन सायकलवर प्रवास करत वारंगा फाटा येथे रात्री मुक्कामी थांबतील. मंगळवारी वारंगा फाटा ते हदगाव येथे मुक्कामी असेल. हदगावहून २८ तारखेला सवाना येथे पोहोचून अन्य एनसीसी ग्रुप हेड कॉटर अमरावती ग्रुपला हे बॅटन सुपूर्द करतील. पुढे नागपुर ग्रुप येथे देऊन मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या एनसीसी संचालनालयास सुपूर्द करतील