ETV Bharat / state

अर्धापूरमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची पुण्यात दिवाळी साजरी - अर्धापूरमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची पुण्यात दिवाळी साजरी

अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची दिवाळी पुण्यात आनंदात पार पडली. त्यानंतर ते गुरुवारी आपल्या गावी परतले आहेत. भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अर्धापूरमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची पुण्यात दिवाळी साजरी
author img

By

Published : Nov 1, 2019, 1:08 PM IST

नांदेड - अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची दिवाळी पुणे येथे आनंदात पार पडली. त्यानंतर ते गुरुवारी आपल्या गावी परतले आहेत. भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

हेही वाचा - ज्येष्ठ लेखिका गिरीजा किर यांचे निधन, मराठी साहित्यविश्वावर शोककळा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दहा विद्यार्थी गेली आठ दिवस पुण्यातील विविध कुटुंबात दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते. या कुटुंबाशी विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन त्यांच्यांशी भावनिक नाते जोडले गेले आहे. विद्यार्थ्यांना जणू काही आपल्या आजोळी गेल्याची भावना निर्माण झाली आहे.

पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटंबातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अर्थिकसाह्य देण्यात येते. तसेच शेतकरी कुटुंबाशी भावनिक नाते निर्माण व्हावीत यासाठी रक्षाबंधन, दिवाळी आदी सण एकत्रित साजरी करण्यात येतात. प्रकल्पाचे हे दुसरे वर्ष आहे.

अर्धापूर तालुक्यातील कोंढा, देळूब, धामदरी, मालेगाव, अर्धापूर, नांदला, आदी गावातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिवाळीला पुण्यात बोलविण्यात आले होते. हे विद्यार्थी पुण्यातील विविध कुटुंबातील एक भाग झाले आहेत. विविध कुटुंबात आठ दिवस वास्तव्य केल्यानंतर बुधवारी सायंकाळी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संचालक शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचे संचालक राजेन्द्र हिरमठ, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरक्षक चंद्रशेखर दैठणकर, नांदेड जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर, शेख साबेर, नगरसेविका सरस्वती शेंडगे, श्रीकांत आगस्ती, विठ्ठल काटे, मकरंद टिलू, डॉ. गिरीश चरवड, सुषमा चव्हाण, रघू गौडा, आदी उपस्थित होते.

शेतकरी हा राष्ट्राचा अन्नदाता असून त्यांच्या संकटात उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सामाजिक जाणीव ठेवून काम करणे आवश्यक असून केलेले काम निरपेक्ष भावनेने करावे असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

रूद्राच्या उपस्थितीने सभागृह झाले भावनिक -

तिवरे धरण फुटून भेंडावाडी (ता.चिपळूण) या गावात पाणी शिरून खूप मोठे नुकसान झाले होते. तसेच जीवितहानी झाली होती. येथील चव्हाण कुटुंबातील सर्वच कर्ते पुरूष मृत्यूमुखी पडले. यात दोन वर्षाचा रूद्रा चव्हाण वाचला आहे. त्याचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्विकारले आहे. तोही आपल्या आत्यासोबत पुण्यात दिवाळीला आला होता. त्याच्या उपस्थितीने सर्व सभागृह भारावून गेले.

हेही वाचा - 'क्यार' नंतर आता 'महा' चक्रीवादळाचे सावट

Intro:अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील चिमुकले पुण्याची मायेची शिदोरी घेऊन परतले....

नांदेड: अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटंबातील विद्यार्थी पुणेकरांची मायेची शिदोरी घेवून गुरूवारी आप आपल्या गावी परतले आहेत. Body:अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील चिमुकले पुण्याची मायेची शिदोरी घेऊन परतले....

नांदेड: अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटंबातील विद्यार्थी पुणेकरांची मायेची शिदोरी घेवून गुरूवारी आप आपल्या गावी परतले आहेत.

अर्धापूर तालुक्यातील दहा विद्यार्थी गेली आठ दिवस पुण्यातील विविध कुटुंबात दिवाळी साजरी करण्यासाठी गेली होती. या कुटूंबाशी विद्यार्थी एकरूप होवून त्यांचे भावनिक नाते जोडले गेले आहेत. विद्यार्थ्यांना जणू काही आपल्या आजोळी गेल्याची भावना निर्माण झाली आहे.
पुण्यातील भोई प्रतिष्ठाणाने अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटंबातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अर्थिक साह्य देण्यात येते. तसेच शेतकरी कुटूंबाशी भावनिक नाते निर्माण व्हावीत यासाठी रक्षाबंधन, दिवाळी आदी सण एकत्रित साजरी करण्यात येतात. प्रकल्पाचे हे दुसरे वर्ष आहे.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा, देळूब, धामदरी, मालेगाव,अर्धापूर , नांदला, आदी गावातील  शेतकरी कुटंबातील विद्यार्थ्यांना दिवाळीला पुण्यात बोलविण्यात आले होते. हे विद्यार्थी पुण्यातील विविध कुटुंबातील एक भाग झाले आहेत.विविध कुटुंबात आठ दिवस वास्तव्य केल्यानंतर बुधवारी सायंकाळी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे , संचालक शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचे संचालक राजेन्द्र हिरमठ, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरक्षक चंद्रशेखर दैठणकर, नांदेड जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर, शेख साबेर, नगरसेविका सरस्वती  शेंडगे, श्रीकांत आगस्ती, विठ्ठल काटे, मकरंद टिलू, डाॅ गिरीश चरवड, सुषमा चव्हाण, रघू गौडा, आदी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,मिठाई, फटाके, वाटर बॅग, उबदार कपडे आदी साहित्य देण्यात आले.
शेतकरी हा राष्ट्रचा अन्नदाता असून त्यांच्या संकटात उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सामाजिक जाणीव ठेवून काम करणे आवश्यक असून केलेले काम निरपेक्ष भावनेने करावे आसे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. या कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन व प्रास्ताविक डाॅ. मिलिंद भोई यांनी करून पुण्यजागर प्रकल्पाची माहीती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, सदाशीव कुंदेन, राजेन्द्र कदम, सागर पवार, दिपक वनारसे यांनी पुढाकार घेतला. या विद्यार्थ्यांना अनिता पोटे, माधुरी जाधव, अजय शिंदे, संगीता चौरे, मनोज शिंदे, निलेश राऊत,आशा कळसे मेघा परदेशी आदी कुटुंबात मुक्कामी होते.

रूद्राच्या उपस्थितीने सहभागृह झाले भावनिक
-------------------------------
तिवरे धरण फुटूण भेंडावाडी (ता.चिपळूण) या गावात पाणी शिरूण खुप मोठे नुकसान झाले होते. तसेच जिवीत हानी झाली होती येथील चव्हाण कुटूंबातील सर्वच कर्ते पुरूष मृत्यूमुखी पडले. यात दोन वर्षाचा रूद्रा चव्हाण वाचला आहे.त्याचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्विकारले आहे. तोही आपल्या आत्या सोबत पुण्यात दिवाळीला आला होता. त्याच्या उपस्थितीने सर्व सभागृह भारावून गेले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.