ETV Bharat / state

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित काम करा; नांदेड दौऱ्यादरम्यान कॅबिनेट मंत्र्यांचे आवाहन - कॅबिनेट मंत्री अशोक चव्‍हाण नांदेड दौरा

जिल्ह्याच्या पातळीवर सोडवण्यासारखे असलेले प्रश्न इथेच सोडवले जावेत. ज्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची व मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक आहे, असे प्रश्न मुंबईत मांडून ते सोडवण्यासाठीचे प्रयत्न आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

chavhan
कॅबिनेट मंत्री अशोक चव्‍हाण यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली
author img

By

Published : Jan 4, 2020, 11:43 PM IST

नांदेड - कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्वांना जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे.

चव्हाण म्हणाले, "गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यातील विकास कामांना निधी देताना भाजप सरकारने मुद्दाम आखडता हात घेतला आहे. केवळ निधीअभावी जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित पडले आहेत. ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांची चाळण झाली आहे. ही सर्व परिस्‍थिती सुधारण्याची संधी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. तिन्‍ही पक्षांची वैचारिक बांधणी जरी वेगळी असली तरी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्रित राहून काम करणे गरजेचे आहे"

हेही वाचा - '3 पक्षांच्या सरकारात 'हे' चालतच राहणार'

जिल्ह्याच्या पातळीवर सोडवण्यासारखे असलेले प्रश्न इथेच सोडवले जावेत. ज्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची व मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक आहे, असे प्रश्न मुंबईत मांडून ते सोडवण्यासाठीचे प्रयत्न आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

अशोक चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्‍थान मिळाल्याची भावना यावेळी शेकापचे आमदार श्यामसुंदर यांनी व्यक्त केली आहे. तर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्यास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. यावेळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार शंकर धोंडगे, पीआरपीचे बापूराव गजभारे, काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्यासह घटक पक्षांचे लेकप्रतिनिधी, पदाधिकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित काम करा....

महाविकास आघाडीच्या पहिल्याच बैठकीत ना.अशोकराव चव्‍हाण यांचे आवाहनBody:नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित काम करा....

महाविकास आघाडीच्या पहिल्याच बैठकीत ना.अशोकराव चव्‍हाण यांचे आवाहन

नांदेड:मागील पाच वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील विकास कामांना निधी देताना भाजप सरकारने मुद्दाम दूर ठेवले. केवळ निधीअभावी जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित पडले आहेत. ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांची चाळण झाली आहे. ही सर्व परिस्‍थिती सुधारण्याची
संधी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपणास आली असून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करा असे आवाहन राज्‍याचे कॅबिनेट मंत्री अशोकराव चव्‍हाण यांनी केले.

ना.अशोकराव चव्‍हाण हे तीन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्‍यांनी या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आमदार व प्रमुख
पदाधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहावर प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत ते प्रमुख
मार्गदर्शक म्‍हणून बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले की, हे सरकार जरी तीन पक्षांचे असले तरी,पाच वर्ष काम करणारे आहे. भाजप सरकारने जनतेवर जो अन्याय केला आहे, त्‍यामुळे या सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशावेळी तिन्‍ही पक्षांची वैचारिक बांधणी जरी वेगळी असली तरी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये लेंडी प्रकल्प, सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे,अनेक साठवण तलाव तयार करणे, ऊर्ध्व पैनगंगेतील पळविलेले हक्काचे पाणी पुन्हा परत मिळवून घेणे यासह अनेक
महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी मुख्यमंत्र्याच्या स्‍तरावर वेळोवेळी बैठका घेऊन
त्‍यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या पाठीवर सोडविण्यासारखे असलेले प्रश्न आपण इथेच सोडवूयात व जे मोठे प्रकल्प आहेत, आणि ज्यासाठी राज्‍यमंत्रिमंडळाची व मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक असते, असे प्रश्न मुंबईमध्ये घेऊन जाऊन ते सोडवून आणण्याचे काम आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे.
जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव काम करण्याची आपली तयारी असून तिन्‍ही पक्षांच्या स्‍थानिक कार्यकर्त्यांना सत्तेतील वाटा देण्यासाठी आपण तयार आहोत. काही आगामी
काळात जिल्हास्‍तरीय, तालुकास्‍तरीय, विविध समित्यांची पुर्नबांधणी करण्यात येणार असून यासाठी राज्‍यपातळीवर जे धोरण ठरेल, त्‍यानुसार सर्वच घटक पक्षांना न्याय देण्यात येईल, असेही ना.अशोकराव चव्‍हाण म्‍हणाले.

भाजप सरकारच्या काळात जिल्ह्याला मुद्दाम निधी देण्यात आला नाही. त्‍यामुळे जिल्ह्यात विविध प्रश्न प्रलंबित पडले आहेत. आता मात्र हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण ही महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे, असेही ते म्‍हणाले.

यावेळी बोलताना शेकापचे आ.श्यामसुंदर म्‍हणाले की, अशोकराव चव्‍हाण यांना राज्‍याचे मुख्यमंत्री म्‍हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्‍यांची प्रशासनावरील पकड व जनतेशी असलेले नाते यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. अशोकराव चव्‍हाण यांच्या पाठिशी आपण सदैव खंबीरपणे उभे टाकणार असून त्‍यांच्या भविष्यातील कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्‍छा. त्‍यांच्यामुळे नांदेडला मंत्रिमंडळात स्‍थान मिळाले, याचा निश्चितच फायदा जिल्ह्याच्या विकासाला होईल, असा विश्र्वास आ.शिंदे यांनी व्‍यक्त केला.

यावेळी बोलताना नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर म्‍हणाले की, महाविकास आघाडीची राज्‍यातील जिल्हा पातळीवरील कदाचित ही पहिलीच बैठक असेल. ही बैठक आयोजित केल्याबद्दल मंत्री अशोकराव चव्‍हाण यांचे आभार व्‍यक्त करतानाच त्‍यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित काम करण्यास माझ्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहोत, असेही ते म्‍हणाले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम म्‍हणाले की, राज्‍यशासनाने दोन लाखांची कर्जमाफी केली आहे. ही बाब अभिनंदनीय आहे; परंतु चालू थकबाकीदार व 2 लाखांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात यावा.
याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे माजी आ.सुभाष साबणे म्‍हणाले की, राज्‍याचे काम करण्यासाठी मंत्री अशोकराव चव्‍हाण यांना
आपण मोकळे ठेवूयात. त्‍यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एक
समन्वय समिती स्‍थापन करून त्‍या माध्यमातून लोकाभिमूख प्रशासन देण्याचा प्रयत्‍न
करणे गरजेचे आहे, असे त्‍यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी आ.शंकरअण्णा धोंडगे म्‍हणाले की, भाजपने जिल्ह्याच्या विकासाचा बट्याबोळ केला आहे. महाआघाडी सरकारच्या माध्यमातून अशोकराव चव्‍हाण यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे नांदेडकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप, पीरिपा, स्‍वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल यासारख्या महाआघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार करूयात, असे ते म्‍हणाले.

यावेळी माजी खा.व्‍यंकटेश काब्‍दे यांनी अत्‍यंत अभ्यासपूर्ण मांडणी त्‍यांच्या भाषणातून केली. केवळ जिल्हाच नव्‍हे तर मराठवाड्याच्या विकासासाठी ही महाविकास आघाडीची पहिली बैठक मैलाचा दगड ठरेल. ही बैठक घेतल्याबद्दल त्‍यांनी ना.अशोकराव चव्‍हाण यांचे मनस्वी आभार मानले.

यावेळी पीआरपीचे बापूराव गजभारे, पी.डी.जोशी पाटोदेकर, किरण चिद्रावार, दत्ता कोकाटे, आनंद बोंढारकर, भुजंग पाटील आदिंनी भाषणे केली. बैठकीचे संयोजक व काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी आभार व्‍यक्त केले. यावेळी काँग्रेसचे आ.माधवराव पा. जवळगावकर, आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, माजी आ.हणमंतराव पा. बेटमोगरेकर, माजी आ.वसंतराव चव्‍हाण, माजी आ.रोहिदास चव्‍हाण, आ.मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, दत्ता कोकाटे, आनंद पा. बोंढारकर, चेअरमन गणपतराव तिडके, पप्पु पा. कोंढेकर, मुक्तेश्वर धोंडगे, मनोज भंडारी, कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे युवानेते विक्रांत शिंदे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्‍थिती होती.
-----Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.