ETV Bharat / state

जर भाजपाने हे थांबवलं नाही तर.. आमचा वारसा सांगत न्यालायत जाऊ - चंद्रशेखर आझाद

author img

By

Published : Jun 6, 2022, 10:00 PM IST

सम्राट अशोकांनी या देशात ८४ हजार बौद्ध स्तूप बांधले होते. ते कुठे आहेत, याच जमिनीत आहेत, इथली सगळी मंदिरे त्याच स्तूपवर उभी आहेत, त्यामुळे कितीही खोदलात तरीही बुद्ध विहारच सापडेल, तिरुपती येथील मंदीर असो, अथवा छत्तीसगडमधील शिरधामपूर असो या मंदिराच्या मुळाशी बौद्ध विहारच आहेत. हा वारसा सांगण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ शकतो,असे मत चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केले.

bhim aarmi chandrashekhar azad critisize bjp current politics in nanded
चंद्रशेखर आझाद

नांदेड - देशात ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी उडी घेतली आहे. देशात कुठेही खोदलात तरी बुद्धच सापडतील असं म्हणत, केंद्र सरकारने हे वेळीच थांबवलं नाही तर आम्ही प्राचीन भारताचा आमचा वारसा सांगत आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा चंद्रशेखर आझाद यांनी मोदी सरकारला दिला.

सम्राट अशोकांनी या देशात ८४ हजार बौद्ध स्तूप बांधले होते, ते कुठे आहेत? - ज्ञानव्यापी मशिदीवरून देशात सुरू असलेल्या वादात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनीही उडी घेतली असून देशात कुठेही कितीही खोदा, जिकडे तिकडे तुम्हाला बुद्धच सापडेल, जर भाजपाने हे वेळीच थांबवलं नाही तर आम्ही प्राचीन भारताचा आमचा वारसा सांगत आम्ही न्यायालयात जाऊ असा सज्जड दम चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारला दिलाय. सम्राट अशोकांनी या देशात ८४ हजार बौद्ध स्तूप बांधले होते. ते कुठे आहेत, याच जमिनीत आहेत, इथली सगळी मंदिरे त्याच स्तूपवर उभी आहेत, त्यामुळे कितीही खोदलात तरीही बुद्ध विहारच सापडेल, तिरुपती येथील मंदीर असो, अथवा छत्तीसगडमधील शिरधामपूर असो या मंदिराच्या मुळाशी बौद्ध विहारच आहेत. हा वारसा सांगण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ शकतो, भाजपने हे थांबवलं नाही, तर आम्ही आमचा वारसा सांगू शकतो, देशात प्रत्येक ठिकाणी बुद्ध वारसा मिळेल, असे मत चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केले आहे. तिरुपती येथील मंदीर असो, अथवा शिरधामपूर असो या मंदिरावर दावा करत आम्ही न्यायालयात जाऊ, येथेही बुद्ध वारसा मिळेल, असे मत चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केले आहे.

महागाईच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी हे उद्योग - देशात केंद्र सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरली आहे. यामुळे धार्मिक विषय काढून भाजप दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना बगल देताना मूल्यांना पायदळी तुडविण्याचे काम होत आहे, अशी टीका भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी भाजपवर केली आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करताना देशात अनेक ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, अशी टीका देखील आझाद यांनी केली. यामुळे येत्या काळात आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने प्रत्येक निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रातील आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.