ETV Bharat / state

बामणी जोड रस्त्याचे काम निकृष्ट, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

author img

By

Published : May 10, 2021, 8:09 PM IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले बामणी जोड रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, या कामाची तज्ज्ञ यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी बामणी येथील नागरिकांनी केली आहे.

बामणी जोड रस्त्याचे काम निकृष्ट
बामणी जोड रस्त्याचे काम निकृष्ट

नांदेड - जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले बामणी जोड रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, या कामाची तज्ज्ञ यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी बामणी येथील नागरिकांनी केली आहे.

अर्धापूर तालुक्यातील नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभड ते बामणी या जोड रस्त्याचे डांबरीकरण व रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून, ठेकेदाराकडून हे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे केले जात आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवतांना डांबराचा वापर करण्यात आला नाही. केवळ गिट्टी टाकून हे खड्डे बुजवण्यात आले आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पुढे काम सुरू असताना पाठीमागून पुन्हा खड्डे पडत असल्याचे देखील ग्रामस्थांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

'कंत्राटदाराला बिल देण्यात येऊ नये'

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उत्तर विभागामार्फत बामणी जोड रस्ता डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून, यासाठी ४० लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. मात्र ठेकेदाराकडून सध्या होत असलेले काम हे ५० टक्क्यांपेक्षाही कमी खर्चात होताना दिसत आहे. खड्डे भरताना डांबर तर वापरलेच नाही, परंतु डांबरीकरणात सुध्दा कमी डांबर वापरले आहे. तीन-चार इंच जाडीचा लेअर टाकून थातूरमातूनर डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता उखडण्याची शक्यता आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार न केल्यास ठेकेदाराला बिल देऊ नये अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.

बामणी जोड रस्त्याचे काम निकृष्ट, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी

रस्त्याचे काम सुरू असले तरी पुन्हा अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी बामणी येथील नागरिक कैलास कदम, शंकर कदम, अदिनाथ कदम, रामचंद्र कदम यांनी केली आहे.

हेही वाचा - गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फेर याचिका न्यायालयात दाखल करू - मंत्री विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.