ETV Bharat / state

नांदेडमधल्या वाळूमाफियांवर 18 लाख रुपये दंडाची कारवाई - 18 lakhs

लोकसभा निवडणूकीत प्रशासन व्यस्त असल्याने वाळूमाफियांनी फायदा उचलला. त्यामुळे मुदखे़ड तालुक्यातील वासरी,शंखतिर्थ, टाकळी, खुजडा या गावातून शेकडो ब्रास रेती उत्खनन केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात अवैध रेती उत्खनन वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्याबरोबर लगेचच त्यांच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली.

नांदेडमधल्या वाळूमाफियांवर दंडाची कारवाई.
author img

By

Published : Jun 1, 2019, 1:26 PM IST

नांदेड - मुदखेड तालुका येथील वाळूमाफिया करत असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात तहसील कार्यालयाच्या तीन विशेष पथकाने अचानक धाडी टाकल्या. या धाडीमध्ये एक ट्रॅक्टर, दोन टिप्पर, दोन जेसीबी मशीन अशा चार वाहनमालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण १७ लाख ७ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली गेल्याचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी सांगितले.

नांदेडमधल्या वाळूमाफियांवर दंडाची कारवाई.

लोकसभा निवडणूकीत प्रशासन व्यस्त असल्याने वाळूमाफियांनी त्याचा फायदा उचलला. त्यामुळे मुदखे़ड तालुक्यातील वासरी,शंखतिर्थ, टाकळी, खुजडा या गावातून शेकडो ब्रास रेती उत्खनन केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात अवैध रेती उत्खनन वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्याबरोबर लगेचच त्यांच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली

मे महिन्यातील २४ तारखेच्या मध्यरात्री खुजडा येथे एका ट्रॅक्टरद्वारे (एमएच२६-एआर १४५0)अवैधपणे ब्रास रेती घेऊन जात असल्याचा प्रकार आढळून आला. त्या ट्रॅक्टरमालकाच्या नावे १ लाख दोन हजार रुपयांची दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे.
दुसऱ्या कारवाईत त्याच महिन्याच्या २५ तारखेला पहाटे वासरी शंखतिर्थ शिव रस्त्यालगत दोन टिप्पर (एमएच २६- एडी १११७ व एमएच 0५एमएम ७८९९) प्रत्येकी २.५ ब्रास वाळू अवैधपणे रेती वाहतूक करत असताना आढळून आले. तेव्हा सदर वाहने तहसिल कार्यालयात जमा करून संबधित वाहन मालकावर प्रत्येकी १ लाख ५ हजार रूपये दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे.

तिसऱया कारवाईत २६ तारखेला रात्रीच्या वेळी तक्रार प्राप्त झाल्याने तहसील कार्यालयाच्या पथकाने अचानक धाड टाकली. गोदावरीच्या नदी पात्रातील जेसीबी मशीन जप्त करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी या मशीन पोलीस बंदोबस्तात तहसील कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. मशीन मालकांवर ७ लाख ५० हजार रु. दंडाच्या वसुलीची कारवाई करण्यात आली आहे.

Intro:
नांदेड - वाळूमाफियाविरुद्ध 18 लाखांची दंडाची कारवाई.

नांदेड : मुदखेड लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दि. २४ ते २७ मे दरम्यानच्या तीन दिवसांत तीन विशेष पथके तयार करुन रेतीघाट
असलेल्या गावाच्या हद्दीत अचानक धाडी टाकण्यात आल्या. तपासणी करत एकूण एक ट्रैक्टर, दोन टिप्पर, दोन जेसीबी मशीन अशा चार वाहनमालकांवर एकूण १७ लाख ७ हजार रूपयांची दंडात्मक कार्यवाही केल्याचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी सांगितले.
प्रशासनास लोकसभा निवडणूकची कामे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी तिकडे व्यस्त होते. Body:
या बाबीचा गैरफायदा घेत वाळू माफीयांनी तालुक्यातील वासरी,शंखतिर्थ, टाकळी, खुजडा या गावातून शेकडो ब्रास रेती उत्खनन केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून या भागात अवैध रेता उत्खनन वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्याबरोबर लगेचच त्याच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली.यामध्ये दि.२४ मे रोजी मध्यरात्री मौजे खुजडा येथे ट्रॅक्टरद्वारे या ट्रेक्टर क्र. एमएच२६-एआर १४५0 हा अवैधपणे एक ब्रास रेती घेऊन जात असल्याचे आढळून आला.सदर वाहन पकडुन तहसील कार्यालयात जमा करत वाहनमालकाच्या नावे १ लाख दोन हजार रुपयांची दंड भरण्याची नटीस देण्यात आली आहे. दुस-या कार्यवाहीत दि.२५ मे रोजी पहाटे मौजे वासरी शंखतिर्थ शिव रस्त्यालगत टिप्पर क्रं.एमएच २६- एडी १११७ व टिप्पर क्रं.एमएच 0५एमएम ७८९९ मध्ये प्रत्येकी २.५ ब्रास वाळू अवैधपणे रेती वाहतूक करीत
असताना आढळून आले.Conclusion:
तेव्हा सदर वाहने तहसिल कार्यालयात जमा करून संबधित वाहन मालकावर प्रत्येकी १ लाख ५ हजार रूपये दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे.तसेच तिस-या कार्यवाहीत
दि.२६ मे रोजी रात्रीच्या वेळी भ्रमणध्वनी वरुन तक्रार प्राप्त झाल्याने तहसील कार्यालयाच्या पथकाने अचानक धाड टाकत मौ. टाकली गोदावरीच्या नदी पात्रात जेसीबी मशीन आढळून आले. ही मशीन जप्त करण्यात आली. सदरील जेसिबी मशीन टाटा कंपनीची असून एस ११० मशीन क्र. एस ११०-११६३४ आहे.हे मशीन गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाहतुकीसाठी रस्ता करत वाळू उत्खनन
करताना जेसीबी आढळून आल्याचे विशेष पथकातील अधिका-यांनी सांगितले.दि.२७ मे सदर मशीन रोजी पोलिस बंदोबस्तात तहसील कार्यालयात लावण्यात आली. या मशीन मालकावर ७ लाख ५०
हजार रु.दंडाच्या वसुलीची कार्यवाही करण्यात आली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.