नांदेड : राज्यासह नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी 7 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 229 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 98, तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 131 बाधित आले. याशिवाय रविवारी 114 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
22 बाधितांची प्रकृती गंभीर
नांदेड जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 24 हजार 538 झाली असून यातील 22 हजार 818 जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण 899 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती गंभीर आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 606 जणांचा मृत्यु
शनिवार 6 मार्च रोजी अय्यप्पा स्वामी नगर, किनवट येथील 78 वर्षीय महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 606 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
नांदेडमध्ये कोरोनाचा कहर वाढला; जिल्ह्यात आढळले 229 नवे कोरोनाग्रस्त - nanded corona
रविवारी 7 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 229 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 98, तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 131 बाधित आले.