ETV Bharat / state

नांदेडमध्ये आज 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, रुग्णांची संख्या 26 वर - निर्जंतुकीकरण

नांदेडमध्ये आतापर्यंत 1 हजार 120 लोकांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 65 तपासणी अहवाल प्रलंबित असून 5 जणांच्या तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 26 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

शासकिय रुग्णालय, नांदेड
शासकिय रुग्णालय, नांदेड
author img

By

Published : May 2, 2020, 8:53 PM IST

नांदेड - लंगर साहीब गुरुद्वारापरिसरातील 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पंजाबमधून आलेल्या 4 वाहन चालकांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर प्रशासनाने लंगरच्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केल्या. त्यात 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 वर पोहोचला असून यापैकी एकाचा उपचारादरम्यान तर एकाचा उपचारानंतर मृत्यू झाला आहे. सध्या 24 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

नांदेडमध्ये आज 20 कोरोनाबाधित रुग्ण वाढ, रुग्णांची संख्या 26 वर

लॉकडाऊनच्या काळात नांदेडमध्ये लाखो गोर-गरिबांना भोजन पुरवत लंगरसाहीबने सामाजिक भान जोपासले होते. लंगर साहीबच्या तयार जेवणामुळे नांदेडमध्ये गरीबांवर अन्नासाठी दाही दिशा भटकंती करायची वेळ आली नाही. दरम्यान, पंजाबचे जवळपास 4 हजार भाविक नांदेडमध्ये अडकून पडले होते. या भाविकांची देखील सर्व व्यवस्था लंगरसाहिबमध्ये करण्यात आली होती.

या भाविकांना पंजाबात पाठविण्यात आले आहे. त्यांना सोडण्यास गेलेल्या नांदेडच्या चार चालकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या 351 भाविकांना कोरोनाची लागण झाल्याने नांदेड हादरले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लंगर साहिबच्या 97 कर्मचाऱ्यांची काल तपासणी करण्यात आली. त्यातील 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल आहे.

नांदेडमध्ये आतापर्यंत 1 हजार 120 लोकांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 65 तपासणी अहवाल प्रलंबित असून 5 जणांच्या तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 26 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी देशविदेशातून शीख भाविक नांदेडला येत असतात. त्यामुळे कोरोनाचा नांदेडमध्ये शिरकाव कसा झाला याचा शोध घेणे हे मोठे आव्हान आहे.

दरम्यान, आज हे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने गुरुद्वाराच्या सर्व परिसराला कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. चिखलवाडी, बडपुरा आणि शहीदपुरा या भागाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच या सगळा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट: व्यावसायिक छायाचित्रकारांचे काम ठप्प; ऐन लग्न सराईत हाताला काम नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.