नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या जाहीर सभेत तरुणांची संख्या प्रचंड होती. सर्व तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी आले होते. देशाच्या विकासाला सकारात्मक चालना मिळावी, या दृष्टीने पंतप्रधान मोदी प्रयत्न करत असल्याचा दावा तरुणांनी केला आहे.
मोदी नावाचे संघटन तयार करून या तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी तेथील तरूणांसोबत आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत करून त्यांचे निवडणुकीतील मुद्दे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.