नागपूर - शेजारच्या घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा गावात घडली आहे. पहाटे उईके कुटुंबीय झोपेत असताना शेजारच्या घराची भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे.
हेही वाचा - नागपुरात हायटेक पद्धतीने घरफोड्या करणाऱ्या प्रेमी युगुलाला अटक
सावनेर रस्त्यावर बोरुजवाडा हे गाव आहे. पहाटे सर्व गाव झोपेत असताना अचानक शेजारच्या घराची भिंत उईके यांच्या घरावर कोसळली. पावसाच्या संततधारेमुळे घराची भिंत कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका मुलाचा समावेश असून महिला जखमी झाली आहे.