ETV Bharat / state

विदर्भात सरासरी १०० टक्के पावसाची नोंद; गोंदिया, यवतमाळ, अकोल्यात टक्केवारी घटली

author img

By

Published : Jul 10, 2020, 6:08 PM IST

मान्सूनचा वेग काहीसा मंदावलेला असला तरी गेल्या संपूर्ण महिनाभरात विदर्भात सरासरी शंभर टक्के पाऊस झाला. विदर्भात पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरीही भात शेतीचा पट्टा समजला जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मात्र पावसाने दगा दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी याबाबत माहिती दिली.

Rainfall
पावसाची नोंद

नागपूर - महाराष्ट्रामध्ये यावर्षी सर्वात अगोदर मान्सूनचे आगमन विदर्भात झाले. मात्र, त्यानंतर मान्सूनचा वेग काहीसा मंदावलेला असला तरी गेल्या संपूर्ण महिनाभरात विदर्भात सरासरी शंभर टक्के पाऊस झाला. प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी याबाबत माहिती दिली. पुढील पाच दिवस विदर्भात विविध ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक असलल्याने शेतकरी आनंदात आहेत.

विदर्भात सरासरी १०० टक्के पावसाची नोंद

विदर्भात पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरीही भात शेतीचा पट्टा समजला जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मात्र पावसाने दगा दिला आहे. तेथे सामान्य पेक्षा २९ टक्के कमी पाऊस झाला आहे. एका महिन्यात गोंदिया मध्ये ३११ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता, प्रत्यक्षात २२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्यावर्षी सुद्धा गोंदियामध्ये जून महिन्यात २५ टक्के पाऊस कमी झाला होती अशी नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यातही सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. महिनाभरात यवतमाळमध्ये १८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही तूट ४६ टक्यांची आहे. अकोल्यात १८ टक्के पाऊस कमी झाला आहे. येथे पावसाचे सामान्य प्रमाण १९७ मिलीमीटर असणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात अकोल्यात १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

विदर्भातील हे तीन जिल्हे सोडल्यास इतर जिल्ह्यांमध्ये महिनाभरात झालेल्या पावसाचे प्रमाण चांगले आहे. अमरावतीमध्ये सामान्यपेक्षा ५ टक्के जास्त पाऊस झाला आहे तर वाशीममध्ये हे प्रमाण सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उपराजधानी नागपूरात सुद्धा ९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ८ जुलै दरम्यान नागपूरात २५५ मिलिमीटर पावसाची नोंद होणे अपेक्षित होते मात्र, येथे २७८ मिलिमीटर म्हणजेच ९ टक्के जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा २७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील वर्धा गडचिरोली, भंडारा,चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ९० ते ९५ टक्के पाऊस झालेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.