ETV Bharat / state

नितिन गडकरी आणि सरसंघचालक भागवत आज एकत्र; सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार?

'जिव्हाळा' पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने गडकरी आणि भागवत दोघेही एका ठिकाणी येणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्यात सत्ता संघर्षाचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 7, 2019, 7:27 AM IST

नागपूर - राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. अशात संकट मोचक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची नावे चर्चेत आली आहेत. या पार्श्वभूमीवर आज या दोघांची नागपुरात भेट होणार आहे.

'जिव्हाळा' पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने गडकरी आणि भागवत दोघेही एका ठिकाणी येणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्यात सत्ता संघर्षाचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा - 'ज्याच्याकडे बहुमत आहे तो सरकार बनवेल, भाजपने तसा दावा केला तर आनंदच'

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील संघ मुख्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यानंतर सत्तासंघर्षाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पुढाकार घेतील, अशी चर्चा जोर धरू लागली होती. त्यातच दिल्लीमध्ये काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Intro:राज्यात सत्ता संघर्षाचा पेच अजूनही फसला आहे...अश्यात संकट मोचक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची नावे चर्चेत आली आहेत..या पार्श्वभूमीवर आज या दोघांची भेट नागपुरात होणार आहे....निमित्त जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आहे,या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यात सत्ता संघर्षाचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे,त्यामुळे सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागलेले आहे
Body:दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती त्यानंतर राज्यात वेगाने घडामोडी घडत असताना सत्तासंघर्षाचा तिला सोडून यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पुढाकार घेतील अशी चर्चा जोर धरू लागली त्यातच दिल्लीमध्ये काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत ा सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आज नागपूर येथे आयोजित जिव्हाळा पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित राहणार असून यावेळी सत्तासंघर्षाचा तिडा सोडवण्यात संदर्भात या दोघांमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे

सूचना- बातमी सोबत फाईल फुटेज जोडलेले आहेत,ते कृपया टू विंडो मध्ये लावून घ्यावेत Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.