ETV Bharat / state

निवडणुकीचे कामकाज आटोपून परतणाऱ्या शिक्षकांवर काळाचा घाला; २ जण ठार, २ जखमी - नागपूर

या अपघातात ३८ वर्षीय नुकेश मेंढुले हे जागीच ठार झाले. तर ५६ वर्षिय पुंडलिक बहे यांचा आज सकाळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चारचाकी झाडाला धडकल्याने हा अपघात झाला.
author img

By

Published : Apr 12, 2019, 1:25 PM IST

नागपूर -निवडणुकीचे कामकाज आटोपून परत येत असलेल्या शिक्षकांची गाडी रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात उमरेडच्या २ शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य दोन शिक्षक देखील गंभीर जखमी झाले आहेत. वाहनाने झाडाला धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी जोररदार होती की, चारचाकी गाडीचा पार चुराडा झाला आहे.

या अपघातात ३८ वर्षीय नुकेश मेंढुले हे जागीच ठार झाले. तर ५६ वर्षिय पुंडलिक बहे यांचा आज सकाळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात विजय बोहरूपी आणि रमेश पिपरे असे जखमी झालेल्या अन्य शिक्षकांची नावे आहेत.

जखमींना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक आज पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनाने उमरेडच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी त्यांची गाडी झाडावर जाऊन आदळली.

Intro:नागपूर

निवडणुकीचे कामकाज आटोपुन परतीच्या प्रवासात काळाने केला घात; अपघात २ शिक्षकांचा मृत्यू

निवडणुकीचे कामकाज आटोपून परत येत असतांना शिक्षकांच्या गाडीला अपघात उमरेडच्या २ शिक्षकांचा अपघात मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. वाहनानं झाडाला धकड दिल्याने हा अपघात झालाय धडक इतकी जोररदार होती ही चारचाकी चा चेंदामेंदा झालाय
यामध्ये ३८ वर्षीय नुकेश मेंढुले हे जागीच ठार झाले तर ५६ वार्षिय पुंडलीक बहे यांचा आज सकाळच्या सुमारास शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.Body:तसंच या भीषण अपघात अन्य दोन शिक्षक देखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात विजय बोहरूपी आणि रमेश पिपरे असे जखमी झालेल्या अन्य शिक्षकांची नावं आहेत. 
जखमींना उपचारासाठी नागपूर च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Conclusion: शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती.निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक आज पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनाने उमरेड च्य दिशेनी रवाना झालेत. आणि चारचाकी ने झाडाला जोरदार धडक दिली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.