ETV Bharat / state

Anti Nylan Manja Campaign : 'मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही', विद्यार्थ्यांनी घेतली शपथ - नागपूर जिल्हा

नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद तसेचं महानगरपालिकेच्या चार हजार शाळांमध्ये (government schools of Nagpur) आज नायलॅान मांजा न वापरण्याची (anti Nylan Manja campaign) शपथ विद्यार्थ्यांना देण्यात (Students participate) आली आहे. जिल्हा प्रशासना मार्फत जिल्हास्तरावर नायलॅान मांजा विरोधी अभियान राबविण्यात येत आहे.

Anti Nylan Manja Campaign
विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
author img

By

Published : Jan 11, 2023, 4:34 PM IST

जिल्हास्तरावर नायलॅान मांजा विरोधी अभियान

नागपूर : मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार (anti Nylan Manja campaign) नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी (Students participate) घेतली. यासोबतच पालकांनी आपला पाल्य पतंग उडवतांना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे आणि नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पालकांना (government schools of Nagpur) करण्यात आले.

Anti Nylan Manja Campaign
विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

छुप्या मार्गाने नायलॉन मांज्याची विक्री सुरूच : बच्चे कंपनीसोबतचं सर्व वयोगटातील लोकांचा आवडता उत्सव म्हणजे पतंगबाजी उत्सव सुरू झाला आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरात पतंगबाजी सुरू झालेली आहे. मात्र, ही पतंगबाजी जेवढा आनंद देते, त्यापेक्षा अधिक दुःख, वेदना आणि त्रासदायक ठरते आहे. याचं कारण म्हणजे नायलॉन मांजा. जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना देखील छुप्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री केला जातो आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या आठ दिवसात लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला असला तरी, विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जराही कायद्याची भीती नसल्याने नायलॉन मांजा सर्रासपणे विकला जातो आहे. मात्र, आता नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांबरोबरचं ग्राहकांना अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे. सर्व-सामान्य नागरिकांच्या मदतीने पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

नायलॉन मांज्यावर पोलिसांची नजर : पतंगबाजी करताना जिथे नायलॉन मांजा वापर होत असेलेल्या भागात ड्रोन कॅमेराच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. याशिवाय बिट- मार्शलला देखील कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. कुठे कुठे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचा आढावा घेऊन डीलर्सवर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. याच बरोबर रेकॉर्डवरील नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रासायनिक प्रक्रिया करून धागा तयार : मकरसंक्रांतीचा सण शहरात तसेचं ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नायलॅान मांजाची खरेदी आणि विक्री केली जाते. हा मांजा नायलॅान धाग्यापासून तयार करण्यात येतो. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे हा मांजा सहजा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो.

ऑनलाइन विक्रीवर पोलिसांचे लक्ष : नायलॉन मांजाची विक्री ऑनलाइन साइट्सवर सर्रासपणे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर नागपूर शहर पोलिसांनी सर्व ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या साईटला मेल पाठवून मांजाची विक्री करू नये, असे निर्देश दिले आहेत.

मनपाकडून कारवाईचा बडगा : नागपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने नायलॉन मांजाच्या विरोधात 98 आस्थापनेची तपासणी करण्यात आली. कोणत्या दुकानात प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा विक्री केला जातं असेल तर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.