नागपूर - शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यवावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेत मास्क लावण्याचा सल्ला दिला. रात्रीची उतरली नसावी म्हणून तशीच पत्रकार परिषद घेऊन बोलले असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
शिवसेनेचे आमदार गायकवाड यांचे काय होते वक्तव्य..
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, अशा प्रकारचे वक्तव्य पत्रकार परिषदेत आमदार गायकवाड यांनी केले होते. विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे असेही ते म्हणाले होते. यावेळी त्यांनी एकेरी भाषेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांना उद्देशून वक्तव्य केले.
हेही वाचा - महाराष्ट्राने कोरोना लसीचा काळाबाजार केला - चंद्रकांत पाटील
हेही वाचा - कोरोनाच्या काळात इतर राज्यांमध्ये प्रवास करणार आहात...जाणून घ्या नियम