नागपूर - माझा कुणी नेता नाही, माझा नेता दिल्लीत नाही. मी कुणा नेत्याचा गुलाम नाही. मी जनतेचा गुलाम आहे राजकारणात जात-धर्म बघितले जातात. झेंड्याचा रंग पांढरा असेल तर कुणी मतदान करत नाही. 75 ते 80 टक्के लोक जात पाहून मतदान करतात, त्यामुळे या देशाचे वाटोळे झाले आहे. सेवा करून मत मिळत नाहीत कारण, लोक झेंड्याचा रंग पाहून मतदान करतात, अस मत राज्य मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
विदर्भ विद्यार्थी परिषदेत ते बोलत होते. मंत्री कडू पुढे म्हणाले, आजकाल निवडणुकीच्या प्रचाराला हिरो आणि हिरोईन आणावी लागते. मलाही निवडणुकीच्या वेळी माझ्या प्रचाराला नाना पाटेकर यांना बोलवा, असे कार्यकर्ते म्हणत होते. मी त्यांचे ऐकले नाही. मी एकटा निवडणूक लढवूनही निवडून आलो कारण, मी जनतेचा गुलाम आहे.
हेही वाचा - संघावर बंदी येईल तेव्हाच मनुवाद संपेल - चंद्रशेखर आझाद