मुंबई - दिशा सालियान प्रकरणी ( Disha Salian Death Case ) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर ( Shiv Sena Leader Aaditya Thackeray) सतत आरोप होत आहेत. शिंदे गटाकडून संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thackeray Will Going Court In Disha Salian Case Allegation ) त्यामुळेच याला कायदेशीर प्रत्युत्तर देण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची (Aaditya Thackeray Court Petition Disha Case) माहिती सूत्रांनी दिली आहे.
आदित्य उद्धव ठाकरे यांचेच होते 44 कॉल दिशा सालियान ( Disha Salian Death Case ) प्रकरणात आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Will Going Court In Disha Salian Case Allegations) यांचा हात असल्याचा दावा सातत्याने भाजपचे आणि शिंदे गटाचे काही नेते करत आहेत. तसेच रिया चक्रवर्तीला AU म्हणून जे 44 कॉल आले होते ते आदित्य उद्धव ठाकरे यांचेच होते, असा दावा शिंदे गटाचे खासदार शेवाळे ( MP Rahul Shewale Allegations On Aditya Thackeray ) यांनी केला आहे. दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशीही मागणी विधिमंडळात केली. तसेच सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळात एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली होती.
आरोपांना कायदेशीर उत्तर देण्याची तयारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली. सीबीआयने देखील यासंदर्भात परिपत्रक काढून दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. आदित्य ठाकरेंवर ( MP Rahul Shewale Allegations On Aditya Thackeray) होत असलेल्या या आरोपांना कायदेशीर उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आता यावर नेमकी काय कारवाई करतात याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.