ETV Bharat / state

भाजपा नेत्या सना खानची हत्या आर्थिक वादातून, नागपूर पोलिसांनी आरोपी विरोधात दाखल केलं आरोपपत्र

Sana Khan Murder Case : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सना खान यांची हत्या आर्थिक वादातून झाल्याचं पोलिसानी आरोपपत्रात नमूद केलंय. आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु झालीय.

Sana Khan Murder Case
Sana Khan Murder Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 11:51 AM IST

नागपूर Sana Khan Murder Case : बहुचर्चित हिना उर्फ सना मोबिन खान हत्या प्रकरणात नागपूर शहर पोलिसांनी अखेर मुख्य सूत्रधार अमित उर्फ पप्पू रज्जनलाल साहू आणि इतर पाच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. दोन ऑगस्टला सना यांची मध्यप्रदेशच्या जबलपूर इथं हत्या झाल्याचे अनेक पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती लागले असले तरी, सना यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना सपशेल अपयश आलंय. सना यांची हत्या आर्थिक वादातून झाल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केलंय. त्यामुळं आता या प्रकरणात न्यायालयीन प्रकिया सुरु झालीय. महत्त्वाचं म्हणजे सना खानचे शेवटचं लोकेशन मध्यप्रदेशच्या जबलपूर इथं होतं त्यामुळं त्यांची हत्या जबलपूर इथं झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, सना खान यांच्या आईनं नागपूर पोलिसांत तक्रार दिल्यामुळं या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा नागपूर शहर पोलिसांनी केलाय.

आरोपींविरोधात भक्कम साक्ष पुरावे : भारतीय जनता पक्षाच्या नागपूर येथील स्थानिक नेत्या सना खान यांची हत्या होऊन बराच कालावधी उलटून गेलाय. मध्यप्रदेशातील जबलपूर इथं सना खान यांची हत्या झाली असली, तरी या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी केलाय. सना खान हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे नागपूर पोलिसांनी हाती घेतल्यानंतर आरोपींविरोधात भक्कम साक्ष पुरावे गोळा केले. मात्र अद्यापही सना खान यांचा मृतदेह मिळून आलेला नाही. त्यामुळं आरोपीला न्यायालयातून शिक्षा मिळवून देण्याच पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. नागपूर पोलिसांच्या एका पथकानं मध्यप्रदेशच्या जबलपूर इथं सना खान हत्या प्रकरणात साक्ष पुरावे गोळा करण्याचं काम केलं. या पथकानं मुख्य आरोपी अमित साहूच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत. जबलपूरमध्ये सना खानच्या राहत्या घरी अमित साहूनं त्यांची हत्या केली होती. त्याठिकाणी सोफ्याच्या फोममध्ये सुकलेल्या रक्ताचे अंश पोलिसांना मिळाले होते. ते रक्त सना खान यांचं असल्याचा फॉरेन्सिक रिपोर्टही पोलिसांना मिळालाय.

महिलेची साक्ष ठरणार : हत्येच्या दिवशी जेव्हा अमित साहूनं सना खानच्या घरी त्यांचा मृतदेह कार्पेट खाली लपवून ठेवलेला होता. यावेळी एका महिलेनं कार्पेटच्या आत एका महिलेचे पाय पाहिल्याची अत्यंत महत्त्वाची साक्ष पोलिसांना दिल्याची माहिती आहे. याशिवाय अमित साहूच्या हॉटेलमधील नोकर जितेंद्र गौडने यानं आधीच अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त पाहिल्याची साक्ष पोलिसांना दिलीय. त्यामुळं अमित साहूनं सना खान यांची हत्या केल्यासंदर्भात महत्त्वाचे पुरावे आता पोलिसांच्या हाती आले आहेत.

सनाच्या मोबाईलमध्ये खुप काही दडलंय : सना खान हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांना अद्यापही पाहिजे तसं यश मिळालेलं नसल्यानं आता नागपूर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीनं तपास सुरू केलाय. सना खानची हत्या होऊन आता जवळजवळ 30 दिवसांचा कालावधी उलटलाय. मात्र सना खान यांचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. सनाच्या मोबाईलमध्ये खूप काही दडलं असावं. म्हणून आरोपींनी सनाचा मोबाईल नष्ट केल्याचा दाट नागपूर पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा :

  1. Sana Khan Missing case: भाजपा नेत्या सना खान बेपत्ता होण्याचे गूढ कायम, गेला कुठे मृतदेह?
  2. Sana Khana Muder : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या नेत्या सना खाना यांची हत्या
  3. BJP Women Officer Murder : भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या हत्ये प्रकरणी माहिती देणाऱ्याला नागपूर पोलीस देणार एक लाखांचे बक्षीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.