ETV Bharat / state

सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे निमंत्रण नाही - सरसंघचालक मोहन भागवत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळ्यात देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले नाही.

uddhav-thackerays-oath-ceremony
सरसंघचालक मोहन भागवत, उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 28, 2019, 1:12 PM IST

Updated : Nov 28, 2019, 3:41 PM IST

नागपूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळ्यात देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले नाही.

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लालकृष्ण आडवाणी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील शेतकरी ते वारकरी अशा सर्वांना आमंत्रित करण्यात आहे. मात्र, सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेकडून संघाला शपथविधीचे निमंत्रण देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप आणि शिवसेना युतीत असताना अनेकवेळा संघाने मध्यस्थीची भूमिका निभावली आहे. यावेळी सत्ता संघर्षात संघाने मध्यस्थी करावी अशी इच्छा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली होती.

सरसंघचालक मोहन भागवत कोणत्याही राजकीय शपथविधी कार्यक्रमाला जात नाहीत हे देखील स्पष्ट करण्यात आले असल्याने त्यांना निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवत यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, ते कार्यक्रमाला गैरहजर होते.

Intro:शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आज भव्य-दिव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत...या सोहळ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागले आहे...शपथविधी सोहळ्यात देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत, त्या करिता मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे,मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही
Body:महाविकास आघाडीच्या नेतृत्वात शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत... शपथविधी सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे...या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सह लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश आहे....उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधी सोहळ्याला राज्यातील शेतकरी ते वारकरी अश्या सर्वांना आमंत्रित करण्यात आहे,मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात आलेल नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे...हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेने कडून शपथविधी च निमंत्रण संघाला असन अपेक्षित होत मात्र त्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत...भाजप आणि शिव सेना हिंदुत्वावर आधारित युतीत असताना अनेक वेळा संघाने मध्यस्तीची भूमिका निभावली आहे...या ही वेळी सत्ता संघर्षात संघाने मध्यस्थी करावी अशी इच्छा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली होती....काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन शिवसेना सोबत सुरू असलेल्या ओढा-ताडीवर तोडगा काढावा अशी विनंती केल्याचे तर्क राजकीय विश्लेषकांनी लावले होते...शिवसेना आणि संघ हे दोन्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर नेहमीच प्रखर भूमिका घेत राहिले असल्याने सरसंघचालक मोहन भागवत यांना आजच्या शपथविधीला निमंत्रण केले जाणार असल्याचा अंदाज सर्वांनी बांधला होता,मात्र संघाच्या सूत्रांनी शपथविधीसाठी मोहन भागवत यांना निमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे...सर्वात महत्वाचे म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत कोणत्याही राजकीय शपथविधी कार्यक्रमाला जात नाहीत हे देखील स्पष्ट आहे,कारण यापूर्वी त्यांना अनेक शपथविधी कार्यक्रमा साठी निमंत्रित करण्यात आले होते,ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी शपथ घेतली तेव्हा सुद्धा सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली उपस्थिती टाळली होती

Conclusion:
Last Updated : Nov 28, 2019, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.