ETV Bharat / state

Babasaheb Purandare : आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो - सरसंघचालक मोहन भागवत

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बाबासाहेबांना पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.

RSS Chief Dr. Mohan Bhagwat
सरसंघचालक मोहन भागवत
author img

By

Published : Nov 15, 2021, 11:56 AM IST

नागपूर - बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बाबासाहेबांना पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. (Mohan Bhagwat pays homage to Babasaheb Purandare) आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. (Babasaheb Purandare Death News)

काय म्हणाले डॉ. मोहन भागवत?

पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री. बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्ती करिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली.

हेही वाचा - Babasaheb Purandare : एका पर्वाचा अस्त... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ९९व्या वर्षी निधन

त्यांचे जीवन समाजामध्ये शिवरायांची प्रेरणा जागृत ठेवील -

दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेही लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्त्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच "जाणता राजा"सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील, या शब्दात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बाबासाहेबांना पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.