ETV Bharat / state

'जेनेटिक डेटा अ‌ॅनालिसिस'च्या आधारे सरसंघचालकांनी आपली भूमिका मांडली - संघ अभ्यासक - Mohan Bhagwat's statement On the DNA

हिंदू-मुस्लिमांसह सर्व भारतीयांचा डीएनए हा एकच आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण सुरू झाले आहे. मात्र, या वक्तव्याचे संघ अभ्यासकांनी स्वागत केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे विज्ञानवादी आहेत, त्यांनी जगभरात अभ्यास सुरू असलेल्या जेनेटिक डेटा अ‌ॅनालिसिसच्या आधारे आपली भूमिका स्पष्ट केल्याचे मत संघ विचारक आणि अभ्यासक दिलीप देवधर यांनी व्यक्त केले आहे.

दिलीप देवधर
दिलीप देवधर
author img

By

Published : Jul 6, 2021, 5:07 PM IST

Updated : Jul 6, 2021, 5:34 PM IST

नागपूर - दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक म्हणाले होते की, हिंदू-मुस्लिमांसह सर्व भारतीयांचा डीएनए हा एकच आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण सुरू झाले आहे. पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हे वक्त्यव्य केल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून केला जात आहे. मात्र, संघ अभ्यासकांनी त्यांच्या या वक्त्याचे स्वागत केले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हे विज्ञानवादी आहेत, त्यांनी जगभरात अभ्यास सुरू असलेल्या जेनेटिक डेटा अ‌ॅनालिसिसच्या आधारे आपली भूमिका स्पष्ट केल्याचे मत संघ विचारक आणि अभ्यासक दिलीप देवधर यांनी व्यक्त केले आहे.

बोलताना संघ अभ्यासक दिलीप देवधर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवरस सोडले तर सर्व संघचालक हे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातून पदव्युत्तर झालेले आहेत. डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लिम डीएनए संदर्भात केलेले वक्तव्य हे मागील 50 हजार वर्षांपूर्वी समस्त भारतीयांचे जेनेटिकली एकात्मिकरण झालेले आहे. हा नवीन जेनेटिक सायन्सचा डेटा पुढे आलेला आहे. सरसंघचालकांनी हाच संदर्भ दिल्याचे संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी सांगितले. मॉब लिंचिंगच्या (झुंडबळी) ज्या घटना घडतात, त्याकडे हिंदू-मुसलमान म्हणून न बघता गुन्हा म्हणून बघितले पाहिजे. त्याला जातीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले होते. यावरही दिलीप देवधर यांनी सरसंघचालकांची भूमिका अगदी योग्य असल्याचे म्हटल आहे.

राजकारण करणे चुकीचे

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लिम यांचा डीएनए एक आहे, असे म्हणण्यामागचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपल्यातील बंधुभाव टिकवून ठेवला तर पुन्हा जगात आपला देश विश्वगुरु, समर्थ आणि समृद्ध होईल यातून भारताची प्राचीन शान पुन्हा निर्माण होईल. मात्र, काही लोक याचा संबंध राजकारणासोबत जोडतात हे अत्यंत चुकीचे आहे. एक लक्षात घेतले पाहिजे निवडणुका दरवर्षी होतात, राजकीय पक्ष केवळ त्याच दृष्टीने विचार करू शकतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सामाजिक आणि सांस्कृतिक नेते केवळ राष्ट्र निर्माण आणि समाजाची प्रगती याचाच दूरदृष्टी ठेऊन विचार करतात, म्हणून भागवत यांच्या त्या वक्त्यव्याकडे पाहिले पाहिजे, असेही देवधर म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते सरसंघचालक

आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. या सर्वांच्या पूजा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मात्र, यावरून भेद निर्माण करणे चुकीचे असल्याचे मत सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते. आपल्या देशात इस्लाम धोक्यात आहे, अशा प्रकारचा भ्रम जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. मात्र, मुस्लिम समाजाने याबाबत मुळीच भीती बाळगू नये, असेही सरसंघचालक म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून केला जात आहे. आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत संघाने मोठी मेहनत घेतल्यानंतरही मुस्लिम मतदारांनी भाजपला नाकारल्याने सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी नवा फास फेकल्याचा आरोप केला जात आहे.

प्रचारकांच्या जुलै बैठक मध्ये होणार चिंतन

9 ते 11 जुलै दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांची चिंतन बैठक चित्रकूट येथे होणार आहे. या बैठकीत देशभरातील 300 ज्येष्ठ प्रचारक सहभागी होणार आहेत. जुलै बैठकीत सर्व प्रचरकांकडून या विषयावर चिंतन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षण : राज्य सरकारला दिलेला अवधी संपतोय.. तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन - संभाजीराजे

Last Updated : Jul 6, 2021, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.