ETV Bharat / state

देशाला पंतप्रधान देणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण मारणार 'बाजी' - pm

2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना उमेवारी दिली होती ते निवडूण आले होते. मात्र, कायम दिल्ली मुक्कामी असणाऱ्या मुकुल वासनिकांना २०१४ ची ही निवडणूक चांगलीच जड गेली.

किशोर गजभिये आणि कृपाल तुमाणे
author img

By

Published : Mar 26, 2019, 11:38 AM IST

नागपूर - देशाच्या राजकीय इतिहासात महत्वाचा ठसा उमटविणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून रामटेक मतदारसंघाची ओळख आहे. कारण भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे या मतदारसंघातून निवडणूक आले होते. नरसिंहराव यांनी दोन वेळेस या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. २०१४ ला या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणेंनी बाजी मारली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने पुन्हा कृपाल तुमाणे यानांच मैदानात उतरवले आहे.

किशोर गजभिये आणि कृपाल तुमाणे

१४ वर्षाच्या वनवासात प्रभू रामचंद्र रामटेकला आश्रयाला असल्याची आख्यायिका आहे. प्रभू रामचंद्रांमुळे या मतदारसंघाला रामटेक नाव मिळाले आहे. `मेघदुतम`सारख्या विश्व-विख्यात अजरामर काव्याची रचना कवी श्रेष्ठ कालिदासांनी याच रामटेकला केली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे. बहुतांश भाग ग्रामीण असलेला हा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरा मोठा मतदारसंघ आहे.

1980 मध्ये काँग्रेसचे जतीराम बर्वे रामटेकमधून पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर 1984 आणि 1989 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेकचे प्रतिनिधीत्व केले होते. 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना उमेवारी दिली होती ते निवडूण आले होते. मात्र, कायम दिल्ली मुक्कामी असणाऱ्या मुकुल वासनिकांना २०१४ ची ही निवडणूक चांगलीच जड गेली.त्यांचा सेनेचे कृपाल तुमाणेंनी पराभव केला.

काँग्रेसमध्ये गटबाजी

काँग्रेसतर्फे रामेटक लोकसभेसाठी नितीन राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती,तर रामटेकच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामटेकसाठी मुकुल वासनिक यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी देखील केली होती. कारण, नागपूर आणि रामटेकच्या काँग्रेस नेत्यांची गटबाजी जगजाहीर आहे. त्याचा फटका मतदानावर होऊ नये असे इथल्या स्थानिक नेत्यांना वाटत होते. त्यामुळे किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदार

पुरुष मतदार - ९ लाख ८५ हजार ५३९

स्त्री मतदार - ९ लाख १२ हजार ६१

तृतीयपंथी - २३

एकूण १८ लाख ९७ हजार, ६२३ मतदार आहेत.

६ विधानसभा मतदारसंघ परिस्थिती

सुधीर पारवे (उमरेड, भाजप)

चंद्रशेखर बावनकुळे (कामठी, भाजप)

मल्लिकाअर्जुन रेड्डी (रामटेक, भाजप)

समीर मेघे (हिंगणा, भाजप)

सुनील केदार (सावनेर, काँग्रेस)

डॉ. आशिष देशमुख (काटोल, भाजप) - सध्या रिक्त

रामटेक लोकसभा क्षेत्रात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये ४ ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसचे आमदार आणि काटोल विधनसभेचे आमदारपद सध्या रिक्त आहे. काटोल मतदारसंघातून डॉ. आशिष देशमुख यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तेथील पद रिक्त आहे.

रोजगाराचा प्रश्न प्रलंबीत, ग्रामीण मतदारांमध्ये नाराजी

लोकसभा क्षेत्रात ग्रामीण भाग अधिक असल्याने इतर पिकांसोबत धानाची शेती आणि संत्राच्या बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकरी आणि मजूर वर्ग ७०% वास्तव्यास आहे. त्यामुळे सत्तेत येण्याआधी खासदारांनी जी आश्वासने दिली, त्याची पूर्तता झाली नाही. रोजगाराचा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामीण मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. हा मतदारसंघ बघितला तर संपूर्णपणे ग्रामीण आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर काही क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत.

शेतकरी वर्गात नाराजी

जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख हेक्टर शेती सिंचन करून पिकविली जाते. यात प्रामुख्याने मिरची, गहू यासारखी पीके घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेंच धरणातील पाण्याचा मोठा आधार आहे. मात्र, चौरई धरणात पाणी अडविण्यात आले आहे. तेथे १ हजार ३२० मेगावॉट पॉवर प्लांटचे काम प्रस्थपीत आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता आणि सुलतानी संकटात शेतकरी अडकला आहे. उत्पादीत पिकाला दीडपट हमी भाव न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. आश्वासनांची पूर्तता न झल्याने प्रत्येक पातळीवरून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जातीय समीकरणे

रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे जातीय समीकरण बघितल्यास मोठ्या संख्येने दलित आणि मुस्लिम मतदार असल्याने हा पारंपारिकरित्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. येथील उमेदवारांची जागासुद्धा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे येथे परप्रांतीयांची संख्या देखील जास्त आहे. इतर मागास प्रवर्गाची मतेही महत्वाची ठरणार आहेत.

एकूणच राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक परिस्थितीमुळे रामटेक मतदारसंघाला विशेष महत्व आले आहे. येणाऱ्या लोकसभेत येथील मतदार शिवसेनेला साथ देणार की काँग्रेसच्या हाताला हा येणार काळच ठरवेल.

Intro:Body:

Ramtek loksabha overall story

देशाला पंतप्रधान देणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण मारणार 'बाजी'

नागपूर -  देशाच्या राजकीय इतिहासात महत्वाचा ठसा उमटविणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून रामटेक मतदारसंघाची ओळख आहे. कारण भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे या मतदारसंघातून निवडणूक आले होते. नरसिंहराव यांनी दोन वेळेस या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. २०१४ ला या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणेंनी बाजी मारली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने पुन्हा कृपाल तुमाणे यानांच मैदानात उतरवले आहे.

१४ वर्षाच्या वनवासात प्रभू रामचंद्र रामटेकला आश्रयाला असल्याची आख्यायिका आहे. प्रभू रामचंद्रांमुळे या मतदारसंघाला रामटेक नाव मिळाले आहे. `मेघदुतम`सारख्या विश्व-विख्यात अजरामर काव्याची रचना कवी श्रेष्ठ कालिदासांनी याच रामटेकला केली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे. बहुतांश भाग ग्रामीण असलेला हा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरा मोठा मतदारसंघ आहे.

1980 मध्ये काँग्रेसचे जतीराम बर्वे रामटेकमधून पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर 1984 आणि 1989 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेकचे प्रतिनिधीत्व केले होते. 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना उमेवारी दिली होती ते निवडूण आले होते. मात्र, कायम दिल्ली मुक्कामी असणाऱ्या मुकुल वासनिकांना २०१४ ची ही निवडणूक चांगलीच जड गेली.  त्यांचा सेनेचे कृपाल तुमाणेंनी पराभव केला.

काँग्रेसमध्ये गटबाजी

काँग्रेसतर्फे रामेटक लोकसभेसाठी नितीन राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. तर रामटेकच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामटेकसाठी मुकुल वासनिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील केली होती. कारण नागपूर आणि रामटेकच्या काँग्रेस नेत्यांची गटबाजी जगजाहीर आहे. त्याचा फटका मतदानावर होऊ नये असे इथल्या स्थानिक नेत्यांना वाटत होते. त्यामुळे किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदार

पुरुष मतदार - ९ लाख  ८५ हजार ५३९

स्त्री मतदार - ९ लाख १२ हजार ६१

तृतीयपंथी - २३

एकूण १८ लाख ९७ हजार, ६२३ मतदार आहेत.

६ विधानसभा मतदारसंघ परिस्थिती

सुधीर पारवे  (उमरेड, भाजप)

चंद्रशेखर बावनकुळे  (कामठी, भाजप)

मल्लिकाअर्जुन रेड्डी  (रामटेक, भाजप)

समीर मेघे (हिंगणा, भाजप)

सुनील केदार (सावनेर, काँग्रेस)

डॉ. आशिष देशमुख (काटोल, भाजप) - सध्या रिक्त

रामटेक लोकसभा क्षेत्रात ६  विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये ४ ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसचे आमदार आणि काटोल विधनसभेचे आमदारपद सध्या रिक्त आहे. काटोल मतदारसंघातून डॉ. आशिष देशमुख यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तेथील पद रिक्त आहे.

रोजगाराचा प्रश्न प्रलंबीत, ग्रामीण मतदारांमध्ये नाराजी

लोकसभा क्षेत्रात ग्रामीण भाग अधिक असल्याने इतर पिकांसोबत धानाची शेती आणि संत्राच्या बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकरी आणि मजूर वर्ग ७०% वास्तव्यास आहे. त्यामुळे सत्तेत येण्याआधी खासदारांनी जी आश्वासने दिली, त्याची पूर्तता झाली नाही. रोजगाराचा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामीण मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. हा मतदारसंघ बघितला तर संपूर्णपणे ग्रामीण आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर काही क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत.

शेतकरी वर्गात नाराजी

जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख हेक्टर शेती सिंचन करून पिकविली जाते. यात प्रामुख्याने मिरची, गहू यासारखी पीके घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेंच धरणातील पाण्याचा मोठा आधार आहे. मात्र, चौरई धरणात पाणी अडविण्यात आले आहे. तेथे १ हजार ३२० मेगावॉट पॉवर प्लांटचे काम प्रस्थपीत आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता आणि सुलतानी संकटात शेतकरी अडकला आहे. उत्पादीत पिकाला दीडपट हमी भाव न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. आश्वासनांची पूर्तता न झल्याने प्रत्येक पातळीवरून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जातीय समीकरणे

रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे जातीय समीकरण बघितल्यास मोठ्या संख्येने दलित आणि मुस्लिम मतदार असल्याने हा पारंपारिकरित्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. येथील उमेदवारांची जागासुद्धा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे येथे परप्रांतीयांची संख्या देखील जास्त आहे. इतर मागास प्रवर्गाची मतेही महत्वाची ठरणार आहेत.

एकूणच राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक परिस्थितीमुळे रामटेक मतदारसंघाला विशेष महत्व आले आहे. येणाऱ्या लोकसभेत येथील मतदार शिवसेनेला साथ देणार की काँग्रेसच्या हाताला हा येणार काळच ठरवेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.