नागपूर - देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान झाले. तर विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान पार पडले.
रामटेक लोकसभा मतदारसंघात ५१.७२ टक्के इतके मतदान झाले आहे. तर २०१४ मध्ये रामटेक लोकसभा निवडणुकीत ६२.६४ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ११ टक्केनी मतदानात घट झाली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात शेतकरी आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या मतदारसंघात ९० टक्के ग्रामीण मतदारांची संख्या आहे. यावेळी १० लाख ६९ हजार मतदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.