ETV Bharat / state

नागपुरात हलक्या पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना प्रतीक्षा मुसळधारेची

नागपुरात ढगाळ वातावरण असल्याने आज पावसाच्या सरी कोसळतील अशी आशा नागपूरकरांना होती. त्यानुसार सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागपूरकरांच्या अपेक्षा ओल्याचिंब भिजल्या आहेत.

author img

By

Published : Jun 22, 2019, 9:00 PM IST

नागपुरात हलका पाऊस

नागपूर - आज सकाळपासून नागपुरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आज पावसाच्या सरी कोसळतील अशी आशा नागपूरकरांना होती. त्यानुसार सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागपूरकरांच्या अपेक्षा ओल्याचिंब भिजल्या आहेत. नागपुरकरांनी पावसाचा आनंद घेतला असला तरी दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे.

पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पावसाची दमदार हजेरी लागेल अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली होती. आज त्यांचा अंदाज काही अंशी खरा ठरला असला तरी दमदार पाऊस झालेला नाही. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने केवळ शहरातील रस्ते ओले झाले. पण त्यामुळे दमट वातावरण तयार झाले आहे. आज अर्धा तास पाऊस बरसला असला तरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत नागपूरकर आहे.

Intro:मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असला तरी आज सकाळपासूनच नागपुरात ढगाळ वातावरण झाले आहे...आज नक्की पावसाच्या सरी कोसळतील या अपेक्षेने नागपूरकर आकाशा कडे डोळे लावून बसलेला असताना अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने नागपूरकरांच्या अपेक्षा ओल्याचिंब भिजल्या आहेतBody:प्रादेशिक हवामान विभागाने आधीच स्पष्ट केल्या नुसार पश्चिम बंगलच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मध्यप्रदेश छत्तीसगड आणि विदर्भात मान्सून पूर्व पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे...आज त्यांचा अंदाज काही अंशी खरा ठरला असला तरी दमदार पाऊस झालेला नाही...सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने केवळ शहरातील रस्ते ओले झाले पण त्यामुळे दमट वातावरण तयार झाले असून नागरिकांची घामाच्या धारेपासून सुटका झालेली नाही...आज अर्धा तास बरसलेला पाऊस दिलासा देणारा असला तरी आनंद लहरींप्रमाणे बरसणाऱ्या पावसाच्या प्रतिक्षेत नागपूरकर जनता अजूनही आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.