नागपूर : दिव्यांग व्यक्तींना, दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाइन (online process of obtaining a disability certificate)झाल्यामुळे येत असलेल्या अडचणी आणि समस्या (certificate has become simple and easy) आता दूर झाल्याचं चित्र नागपुरात दिसत आहे. दिव्यांग प्रमाणपत्राचा अर्ज एका क्लिकवर उपलब्ध झाल्यानंतर, अवघ्या आठ दिवसात अर्जावर कारवाई होत असल्यामुळे, नागपूर शहरात आणि जिल्हात दिव्यांग प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झालेली आहे.
प्रक्रिया सुलभ : कोरोना काळात दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी येऊ शकत नसल्यामुळे, पेंडंसी वाढली होती. मात्र,आता निर्बंधमुक्त झाल्यानंतर नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडून तालुका स्तरावर विशेष कॅम्प घेण्यात आले. त्यामुळे प्रलंबित अर्ज मोठ्या प्रमाणात निकाली निघाले आहेत, अशी माहिती केंद्राचे समन्वयक अभिजीत राऊत यांनी दिली. तर दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
प्रलंबित अर्जांची संख्या घटली : फेब्रुवारी 2019 ते ऑक्टोबर 2022 या काळात 40 हजार 811 दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर केले होते, त्यापैकी 31 हजार 339 दिव्यांगांना प्रमाणपात्रांचे वितरण करण्यात आले आहे. तर 3 हजार 957 अर्ज बाद ठरवण्यात आले असल्याची माहिती नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडून देण्यात आली आहे. तर 5 हजार 191 केसेस प्रक्रियेत असून; यापैकी 3 हजार 337 अर्ज स्वीकार झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रलंबित अर्जापैकी बहुतांश अर्जदार वारंवार सुचना देऊन देखील वैद्यकीय तपासणीसाठी येत नसल्याची माहिती, अभिजित राऊत यांनी दिली आहे.
युडीआयडी कार्ड झिंरो पेंडिंग : दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र सरकारने संगणकिय प्रणाली विकसित केली आहे. त्याला स्वावलंबन पोर्टल असे नाव देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते युडीआयडी कार्डसाठी पत्र ठरतात. (युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन नंबर) च्या आधारे दिव्यांग व्यक्ती भारतात कुठे ही सेवा प्राप्त करू शकतात. समाजकल्याण विभागाकडे यावर्षी 22 हजार 544 युडीआयडी कार्ड तयार करण्यात आले असून; झिरो पेंडंसी अर्ज असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे अधिकारी किशोर भोयर यांनी दिली आहे.